चंद्रपूर -३० ऑक्टोबरला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी कॉंग्रेसकडून राखी कंचर्लावार, सुनीता अग्रवाल, सुनीता लोढिया, तर भाजपच्या अंजली घोटेकर, राष्ट्रवादीच्या संगीता त्रिवेदी व विद्यमान महापौर संगीता अमृतकर प्रयत्नशील आहेत. सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. विद्यमान महापौर व उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ३० ऑक्टोबरला पूर्ण होत आहे. महापालिकेच्या ३३ प्रभागांसाठी ६६ नगरसेवक आहेत. कॉंग्रेस आघाडी व मित्रपक्षांचे ३८, भाजप १८, राष्ट्रवादी ४, शिवसेना ५ व मनसे १, असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, ऑक्टोबर २६, २०१४
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments