Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे १०, २०१४

विवाहाच्या दुस-याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू

मोठया आंनदी वातावरणात मित्रमंडळीं,पाहूण्यंासह चंद्रमणीची वरात निघाली. आणी आज त्याच मार्गानेे त्याची अत्यंयात्रा काढण्यात नौबत आली.मन सुन्न करणा-या घटनेनंतर कु्रर नियतीचा लंपडाव आज बोरगावात बघायला मिळाला. पहाटे नववराची तब्बेत बिघडली. अनं ग्रामीण रूग्णालयात भरती केल्यानंतर तो गेल्याचीच बातमी गावात पोहचली.कालच ज्या मार्गावरून वाजतगाजत वरात निघाली त्याच मार्गाने आज त्यांची अत्यंयात्रा काढण्याचा कठोर प्रसंग बोरगाववासिंयांवर आला.अन वराती पाहूण्यांना अत्यंयात्रेत सहभागी होण्याची दुर्देवी पाळी आली. नियतीच्या क्रुरतेचा परिचय देणारी हि घटना आज गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे घडली.

गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव. आंबेडकरी चळवळीचे व सुषिक्षीतांचे गाव म्हणून परिचीत आहे. येथील तुकडोजी भसारकर यंाचा 25 वर्षाचा मुलगा चंद्रमणी याचे गावातीलच जालंधर मानकर यांच्या ष्वेता नामक मुलीषी लग्न जुडले.रितीरिवाजानुसार सारीच सोपस्कार पार पाडण्यात आले.पत्रिका निघाल्या.कपडे लत्ते घेणे झाले. 9 मे विवाहाची तारीख निघाली. यानुसार काल वाजत गाजत वरात निघाली. उत्साही ंआणी आंनदी वातावरणात चंद्रमणी व ष्वेता विवाहाच्या बंधनात बांधल्या गेले.सुखी संसाराचे स्वप्न बघित हे दोघही अतिषय आनंदित होते.डोळयात भविष्याची विविध आषा आकांक्षा रेखाटीत ते आपल्याच धुदींत होते.मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. आज पहाटेच चंद्रमणीची तब्बेत बिघडली.चांगले वाटत नसल्याचे त्याने सांगितल्यांनतर त्यांच्या नातेवाईकानी गोंडपिपरी येथील ग्रामीण रूग्णालयात भरती केले. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यु झाला. हि बाब बोरगांवात समजातच गावात षोकाचे वातावरण पसरले. नववधू ष्वेताला तर हि बातमी हादरवून सोडणारी ठरली.विवाहाच्या दुस-याच दिवषी वैधव्य आल्याने ती पुरती हतबल होती. काल विवाहाच्या बंधनात बांधल्या गेलेल्या चंद्रमणीचा मृत्यु झाल्याची बातमी समजताच गावक-यांनी अक्षरष गर्दी केली.मोठया जल्लोषात ज्या ठिकाणी विवाहसोहळा पार पडला तिथे आज आसवांची बरसात झाली.अषापध्दतीने नववराचा मृत्यु व्हावा हि बाब अनेकांना सतावून सोडणारी ठरली. नवजीवनाची स्वप्ने रंगविणा-या चंद्रमणीसाठी आजची पहाट हि काळरात्र ठरली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.