Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०५, २०१४

चंद्रपुरात भाजीपाल्यांचे भाव वाढले

भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने जिल्ह्यातील आवक कमी झाली आहे. परिणामी भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले असून, गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्याचा पर्याय कडधान्यही महागल्याने गृहिंणीसमोर गंभीर संकट ओढवले आहे.


भाजीपाले भाव प्रती किलो
  • बटाटा २0 रुपये किलो,
  • कांदे २0 
  • मिरची ६0 
  • सांबार ४0
  • कोबी(पुल) ४0 
  • शिमला मिरची ४0 
  • गवार शेंगा ३0 
  • भेंडी ३0 
  • कोबी(पत्ता) २0 
  • वांगी २0
  • चवळी शेंगा ३0 
  • फणस २0 
  • टमाटर २0 
  • कारली ४0 रुपयेॅ 
सध्या राज्यभरात सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाचा पारा ४0 अंशावर गेला आहे. एप्रिलपासून उन्हाची तिव्रता अधिकच जाणवत आहे. या वाढत्या उष्णतामानामुळे गावागावातील पाण्याचे स्त्रोत झपाट्याने आटत आहेत. जमिनीचरील पाण्याची पातळीही कमी झाली आहे. याचा परिणाम आता भाजीपाल्यांच्या उत्पादनावर होत आहे. चंद्रपूर शहराच्या अनेक तालुक्यात जिलबाहेरुन भाजीपाल्यांची आवक होत असते.
यासोबतच जिलतील काही वाड्यांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. उन्हाळा वगळता इतर ऋतृत अनेक शेतकरीही आपल्या शेतात भाजीपाल्यांची लागवड करतात. बहुतांश ठिकाणावरुन भाजीपाल्यांची आवक होत असल्याने त्याचे भावही कमी असतात. मात्र सध्या उन्हाळयात पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत.
उन्हाळयात शेतकरीही शेतात भाजीपाल्याची लागवड करीत नाहीत. केवळ काही वाड्यांमधूनच भाजीपाल्याचे उत्पादन होत असते. मागील काही दिवसांपासून जिल्ह्याबाहेरील भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. माल येत नसल्याने भाजी विक्रेत्यांनीही भाव वाढविले आहे. जिल्ह्यातील भद्रावती, सिंदेवाही, बल्लारपूर, नागभीड, मूल आदी तालुक्यात भाजीपाल्यांच्या वाड्या आहेत. वांगी, मिरची, टमाटर, कोबी, कारले यासारख्या भाजीपाल्यांचे उत्पादन वाड्यांमधून घेतले जाते. मात्र मागील काही दिवसांत जिलबाहेरुन आवक कमी झाल्याने हा माल त्याच तालुक्यात विकला जात आहे.
परिणामी चंद्रपूर शहरासह इतर भागात भाजीपाल्यांचे भाव जाम कडाडले आहेत. भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली असून, त्यामुळे भाव वधारल्याचे गंजवार्डातील एका भाजी विक्रेत्याने सांगितले. प्रत्येक भाज्याचे भाव ३0 ते ५0 रुपयांपर्यंत पोहचल्याने गृहिणी चांगल्याच वैतागल्या आहेत. गृहिणींचे बजेटच भाजीपाल्यांनी बिघडवून टाकले आहे.

मिरची भिजल्याने  रंग काळसर
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव परिसरात पूर्वीपासूनच लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. विदर्भातही तोहोगाव परिसर हा मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, मागील एक- दोन वर्षात मिरचीला मिळत असलेला कमी भाव, कापसासारखी सरकारी बाजारपेठ व हमीभाव नसल्याने मिरची उत्पादकांना छोट्या- मोठय़ा व्यापार्‍यांच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे. 
मिरची लागवड खर्च व झालेले उत्पादन यांची गोळाबेरीज केल्यास शेतकर्‍यांना कर्जबाजारी होण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. त्यामुळे मिरचीची लागवड कमी झाली होती व उत्पादनही कमी झाले होते. या हंगामात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबिन पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्‍यांनी नगदी पिकाची लागवड केली. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मिरचीची लागवड बर्‍या प्रमाणात झाली होती. गावठी मिरचीची उत्पादनक्षमता हायब्रीड मिरचीच्या तुलनेत कमी असल्याने लागवड कमी केली. मात्र हायब्रीड मिरचीमध्ये सिफाईव्ह, रोशनी, इंडिका, नंदिता, इंडस आदी मिरचीच्या वाणांची लागवड करण्यात आली. मिरचीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांनी तत्रज्ञान आत्मसात केल्याने मिरचीचे उत्पादन यंदा बर्‍यापैकी झाले. मात्र, ऐन पीक हाती येण्याच्या काळात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे मिरची भिजल्याने मिरचीचा रंग काळसर झाला. चांगल्या मिरचीच्या भावाच्या तुलनेत काळ्या पडलेल्या मिरचीला भाव कमी आहे. यावर्षी मिरचीला पाच ते आठ हजार भाव असल्याने मिरचीची लागवड वाढणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.