Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २४, २०१४

१२ वी फेल चित्रपट लवकरच

नागपूर- नागपूरच्या कलावंताचा समावेश असलेला म१२ वी फेल हा hindi चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. माहितीपट बनविणा-या ज्ञानेश्वर नाडेकर यांनी पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेतला. या चित्रपटाचे ७० टक्के चित्रीकरण नागपुरात पूर्ण झाले असून उषा शिगणे यात मुख्य भूमिका साकारत आहे.

चित्रपट निर्मातीचे क्षेत्र म्हणून मुंबईचेच नाव सर्वांच्या पुढे ङ्मेते. मात्र आता नागपुरातील दिग्दर्शक-कलावंतांनी पुढाकार घेऊ नागपूरच्या लोकेशनवर चित्रपट निर्मितीचे काम हाती घेतले आहे. नागपुरातील सक्करदरा, नंदनवन, फुटाळा आदी ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. म१२ वी फेलफ या चित्रपटातून एका गरीब घराण्यातील मुलीची व्यथा मांडण्यात आली आहे. अभिनेत्री उषा qशगणेसह अभिनेता हरीश गवई, प्रशांत लिखार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संजय समुद्रे यांनी या चित्रपटासाठी गाणे लिहिले असून संगीत चतुरसेन साखरकर यांचे आहे.

वारंवार बारावीत अनुत्तीर्ण होणा-या एका गरीब मुलीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. तिच्या लग्नात ङ्मेणा-या अडचणी, त्यानंतर प्राध्यापकाच्या प्रेमात ती पडते. मात्र घरातून लग्नाला विरोध होतो. लग्न होऊ न शकल्याने तिच्या आङ्मुष्यात आणखी एक व्यक्ती होते . या प्रवासात तिला कोणकोणत्या मानसिक त्रासातून जावे लागते, याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. महाराष्ट्र, मध्ङ्मप्रदेश आणि छत्तीसगड ङ्मेथे हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस दिग्दर्शक नाडेकर यांनी व्ङ्मक्त केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.