Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २९, २०१४

गारपीटग्रस्त मुंडलवासीयांना मैत्रेयचा मदतीचा हात

गारपीटग्रस्त मुंडलवासीयांना मैत्रेयचा मदतीचा हात

प्रत्येक कुटूंबाला तीन शेळ्यांची मदत. ६३ कुटूंबांना मिळणार याचा लाभ

यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुका येथे मुंडल गाव आहे. इथले गावकरी शेतमजूरी करून आपला ऊदरनिर्वाह करतात. विदर्भातील यवतमाळ जिल्हयाला सदैव दुष्काळाने ग्रासलेले आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ आपले भीषण रूप घेउनच उभा ठाकत असतो. यंदा अवकाळी पाऊस आणि
गारपीटीने शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाले आहेत. गारपीटीत अनेक जनावरे, कोंबड्या, शेळ्यांचा जीव
गेला. अनेक समस्यांना सामोरे जाणा-या या गावाची मुलभूत गरज ओळखून मैत्रेय फाऊन्डेशन,
समन्वयीत कृषी विकास प्रकल्प (कृषी समृद्धी) आणि छखथउधऊ नागपूर यांच्या पुढाकाराने यवतमाळ
मधील मुंडल गावात दुभत्या शेळ्या अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधूनिक भारतातील
या गावाची ही हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन मैत्रेय फाऊन्डेशनने हे गाव दत्तक घेतले आहे. या दत्तक
योजनेच्या शुभारंभी गावातील प्रत्येक कुटूंबाला तीन दुभत्या शेळ्या देण्यात आल्यात. प्रत्येक शेळीचा विमा
काढलेला आहे. तसेच दहा दिवसात शेळी अनावधानाने का असेना मरण पावली तर त्या बदली दुसरी शेळी
त्या कुटूंबाला देण्यात येईल. दत्तक योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आज दि. २८ मार्च रोजी मुंडल येथे झाला. कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अधिकारी प्रभाकर सुरेश मिश्रा, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ब्रँच व्यवस्थापक साहू, सेंद्रिय शेतीचे तज्ञ श्रीकांत बयंकरम म्हैसूर. प्रामुख्याने उपस्थित होते. मैत्रेय विदर्भ प्रतिनिधी पांडुरंग बंडगर, गुरूदत्त शेणॉय, मैत्रेय फाऊन्डेशनच्या प्रतिनिधी अनिता खुडे आणि समस्त गावकरी कार्यक्रमाला उपस्थिती होते. गावाची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन शेळी पालन व्यवसाय गावक-यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.