Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २१, २०१४

पतीचा गळा आवळून खून

व्यसनाला कंटाळून काढला प्रवीणचा काटा

पत्नी व सासरा अटकेत : धानोरा येथील घटना

घुग्घुस : पित्याच्या मदतीने आपल्याच पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना धानोरा येथे सोमवारी उजेडात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृताची पत्नी व सासर्‍याला अटक केली आहे. प्रवीण जनार्दन निखाडे (३५) असे मृताचे नाव असून तो चंद्रपूर येथील बालाजी वॉर्डातील रहिवासी आहे.
घुग्गूसजवळील धानोरा येथील रहिवासी वासुदेव धर्मा वासाडे याच्या मंदा नामक मुलीशी झाला होता.
प्रवीण चंद्रपूरवरून सासुरवाडी धानोरा येथे शनिवारी रात्री गेला. तेथे त्याचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. दारू पिवून तो अंगणात पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी बतावणी प्रवीणची पत्नी मंदा व सासरा वासुदेव वासाडे या दोघांनी केली. मात्र मृताचा भाऊ अशोक निखाडे याने संशय व्यक्त करून घुग्घूस पोलिसांकडे तक्रार केली.
त्यावरून ठाणेदार अजित लकडे यांनी तपासचक्रे फिरविली आणि अवघ्या २४ तासात खुनाचा प्रकार उघडकीस आणला.
वासुदेववासाडे व मंदा निखाडे यांना चंद्रपूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ठाणेदार लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाठणकर तपास करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, विभागीय पोलीस अधिकारी राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित लकडे, पी.एस.आय. वाठणकर, डी.बी.चे पंडीत वराटे, बंडू मोहुर्ले, स्वप्नील गुरीले, महिला पोलीस तब्बू कुरेशी, विद्या गेडाम, वैशाली खाडे, लोकेश्‍वरी मोदक, वैशाली पाटील यांची या प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली.

 प्रवीण नेहमी दारू पिवून पत्नीला मारहाण करीत असे. याबाबत सासरा वासुदेव वासाडे याने अनेकदा समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवीणकडून होणारा छळ थांबला नाही. हा प्रकार असहाय्य झाल्याने शनिवारी रात्री पत्नी मंदा व सासरा वासुदेव या दोघांनी संगनमत करून त्याचा गळा आवळून केला. ही बाब तपासात उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली. प्रवीणच्या व्यसनाला कंटाळून काढला काटा घुग्घुस कॉलरी परिसरात तलवारी निघाल्या ■ येथील घुग्घुस कॉलरी परिसरातील शास्त्रीनगर परिसरात गेल्या अनेकांनी पक्के घर बांधून अतिक्रमण केले. याकडे वन खात्याचे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून त्यातून वाद निर्माण होत आहे. जुने व नविन अतिक्रमणधारकांमध्ये भांडणे होत आहेत. यातूनच आज या ठिकाणी तलवारी निघाल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरणनिर्माण झाले होते. हा प्रकार गंभीर असला तरी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ही घटना सोमवारी (दि. २0) दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. एका नागरिकाने सदर घटनेची माहिती घुग्घुस पोलीस ठाण्यात दूरध्वनी वरून दिली. हा गंभीर प्रकार असला तरी घटनास्थळी पोलीस उशिरा पोहचले. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.