आदर्श अहवालावर फेरविचार करण्याचे अधिकार
आता केवळ विधिमंडळालाच
- एकनाथराव खडसे
जळगांव दि 29 – आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्था प्रकरणाचा अहवाल हा विधिमंडळात सादर झालेला आहे, त्यामुळे हा अहवाल आता सभागृहाची व सार्वजनिक मालमत्ता झालेला आहे. जर त्यात काही बदल करावयाचे असतील तर त्याचे अधिकार आता केवळ विधिमंडळालाच आहेत, सरकारला जर आदर्श अहवाल प्रकरणी फेरविचार करावयाचा असेल तर त्याबाबत निर्णय आता मंत्रिमंडळ घेऊ शकत नाही. विधिमंडळ हे सर्वोच्च सभागृह आहे व त्यात बदल करण्याचे अधिकारही आता विधिमंडळालाच आहेत असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी केले आहे.
आदर्श अहवाल प्रकरणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून फेरविचार संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले होते, त्या पार्श्वभूमीवर श्री खडसे बोलत होते. आदर्श अहवाल प्रकरणी फेरविचार करण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ,असे सांगुन मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल करू नये अशी टिका श्री खडसे यांनी केली.
आदर्श अहवाल प्रकरणी फेरविचार करण्यासाठी सरकारने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी श्री खडसे यांनी केली.