चंद्रपूर- मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विदर्भस्तरीय मुस्लिम संमेलन प्रा. जावेद पाशा यांच्या अध्यक्षतेखाली रेडभवन चंद्रपूर येथे गुरुवार(५ डिसेंबर)ला होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे रफिक शेख, आबिद कुरेशी, मुस्तकीम कुरेशी, तायेरा शेख, आसिफ शेख उपस्थित राहणार आहे. डॉ. मेहमुदर्रहमान कमेटीच्या सिफारशी मंजूर करून मुस्लिम मागासवर्गीयांना ८ टक्के आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात येणार आहे. याउद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन अताउल्ला खान, सायरा शेख, यांनी केले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, डिसेंबर ०४, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments