मुंबई, दि.16 : भारतातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याला त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या वेळी निवृत्त होतांना भारतसरकारने भारतरत्न हा देशातील सर्वोच्च सन्मान जाहिर करुन त्याचा यथोचित असा व योग्यवेळीकेलेला सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेता व भाजपाचे ज्येष्ठ नेतेएकनाथराव खडसे यांनी दिली आहे. श्री.खडसे पुढे म्हणतात, सचिन तेंडुलकर ही देवाने क्रिकेटलादिलेली देणगीच म्हटली पाहिजे. मैदानात जसे त्याने उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळले त्याचप्रमाणे त्याचेमैदाना बाहेरील वर्तनही त्याला साजेसेच राहिले. त्याचा शांत स्वभाव, नम्रपणा, खेळातील शिस्त,आत्मविश्वास या गोष्टींमधुन नव्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे.
सचिनसोबतच्या आठवणींना उजाळा देतांना श्री.खडसे पुढे म्हणतात, राज्यात भाजपा-शिवसेनायुतीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्तभारतीय क्रिकेट संघ विरुध्द राज्य मंत्रीमंडळातील मंत्री यांच्यात 10-10 षटकांचा सामना ठेवण्यातआला होता. तेव्हा सचिन बरोबर खेळायची व त्याचा खेळ जवळून पाहण्याची मलाही संधी मिळाली,तो क्षण भाग्याचा व खूप आनंद देणारा होता. सचिनच्या जीवनातील दुसरी इनिंगही त्याच्यापहिल्या इनिंग एवढी उत्तुंग होवो अशा शब्दात श्री.खडसे यांनी सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.