Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर ३०, २०१३

राज्य रंगभूमी प्रयोग परिनिक्षण मंडळाच्या सदस्यपदी सुनील देशपांडे

चंद्रपूर: येथील सुप्रसिद्ध नाट्यलेखक व नाट्य दिग्दर्शक पत्रकार सुनील देशपांडे यांची राज्य रंगभूमी प्रयोग परिनिक्षण मंडळाच्या (सेन्सार बोर्ड) सदस्यपदी निवड झाल्याने साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, देशपांडेंनी नागपूर केंद्रावरून दिग्दर्शनाच्या पारितोषिकांची हॅट्ट्रिक साधली होती. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून या सदस्यत्वाकडे बघितले जात आहे. राज्य रंगभूमी प्रयोग परिनिक्षण मंडळात संपूर्ण राज्यातून ३४ सदस्य आहेत. यात विदर्भातील १0 जणांचा समावेश असून, यापूर्वी मंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांची निवड झाली. हे मंडळ तीन वर्ष कार्यरत राहणार असून, देशपांडेंनी आतापर्यंत आपुलकी, जीवंत मरण व आसरुबा या तीन नाटकांचे लेखन केले. सोबतच त्यांनी ९ नाटके आणि १२ एकांकिकांचे दिग्दर्शन केल्याने त्यांना ही संधी चालून आल्याची चर्चा रंगकर्मी व मित्रपरिवारात आहे. या खेळाला अंतच नाही, गेले द्यायचे राहूनी, आकाश शोधतांना, या नाटकांचे दिग्दर्शन करून त्यांनी पारितोषिकांची हॅट्ट्रिक साधली. २00६ साली त्यांना 'वणी वैभव पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. मागील ३0 वर्षांपासून पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या देशपांडेंनी राज्य नाट्यस्पध्रेत परीक्षक म्हणूनही काम केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.