Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर २०, २०१३

पाथरीच्या ठाणेदारांची मुजोरी कायम

दस-याच्या रावणपूजेवर घेतला आक्षेप आदिवासींच्या भावना दुखावल्या

चंद्रपूर पाथरी पोलिस ठाण्यात रुजू झाल्यापासून वादग्रस्त ठरलेले ठाणेदार घुघुल यांची मुजोरी अद्यापही कायम आहेयापूर्वी अनेकदा तक्रारी झाल्यावरिष्ठ अधिका-यांनी समज दिलीमात्रया ठाणेदाराच्या वर्तणुकीत कोणताही बदल झालेला नाहीदारुबंदीसंदर्भात आंदोलन करणा-या श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यांना अपमानीत करणेअवैध दारूजुगार व्यावसायिकांकडून हप्ता वसुली आणि तक्रारकत्र्यांना धमकाविण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेतसावली तालुक्यातील मेहा (बूजयेथील एका महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणातही आरोपींना अभय देण्याचे काम या ठाणेदारांनी केलेशिवाय गावकèयांनी पोलिस पाटलाविरुद्ध निलंबनाची मागणी केल्यानंतर बनावट अहवाल तयार करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप ठाणेदार घुघुल यांच्यावर आहे.

ठाणेदाराकडून आदिवासींचा अवमान
आदिवासी समाजाकडून भगवान रावणाची पूजा दस-याच्या दिवशी केली जातेयंदा सावली तालुक्यात सम्राट रावण यांच्याबद्दल जनजागृती करणारी पत्रके वाटण्यात आलीमात्रअनुसूचित जमातीविरोधी असलेल्या पाथरी येथील ठाणेदार घुघुल यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेऊन आदिवासींच्या भावना दुखावल्यायाप्रकारामुळे आदिवासी समाज अपमानीत झाला असूनत्यांच्यावर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावाअन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा जागतिक गोंड सगा मांदी संघटनेने दिला आहे.
दसरा उत्सव हा आदिवासी समाजबांधवांचा मोठा उत्सव असूनया दिवशी मोठ्या प्रमाणात राजा रावण यांची पूजा अर्चना करण्यात येतेयानिमित्त संभाजी कुमरेमहानंदा टेकाममारोती उईके यांनी काही पत्रके कार्यक्रमास्थळी वाटप केलीसम्राट राजा रावण त्यांच्याबद्दल समाजात जागृती व्हावीहा त्यामागील उद्देश होताकार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर पाथरी येथील ठाणेदार घुग्घुस यांनी सामदा येथील शाळेचे शिक्षक पीडीकुमरे यांना त्यांच्या शाळेत जाऊन धमकावले आणि पोलिस ठाण्यात तातडीने हजर होण्याची सूचना केलीरावणाची पूजा केल्याप्रकरणी ठाणेदारांनी जातिवाचक शिवीगाळ केलीया प्रकारामुळे आदिवासीबांधवांची मने दुखावली आहेतत्यामुळे ठाणेदारांवर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन करण्यात येईलअसा इशारा मानिक सोयामधीरज शेडमाकेमनोज आत्राममधू मेश्रामबंडू मडावीजोतिराव गावळेमुक्तेश्वर मसरामअशोक कुळमेथेपुरुषोत्तम कुमरे यांनी दिला आहेयासंदर्भातील निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.