Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर २१, २०१३

शहरातील धुळीचे प्रदुषण नियत्रंणात आणा

 बंडु सितारामजी धोतरे यांची मागणी 

चंद्रपूर- देशात व राज्यात सर्वाधिक प्रदुषीत असणाच्या मान चंद्रपूरला मिळालेला आहे, ही नक्कीच भुषणावह नाही. परंतु, प्रदुषीत शहर म्हणुन चंद्रपूर समोर आल्यानंतर वेळो-वेळी प्रदुषण नियत्रंणाबाबत ‘कृती आराखडा’ तयार करण्यात आला. यात उदयोगासोबत स्थानिक संस्था व इतर संबधित विभागाच्या जबाबदा-या सुध्दा ठरविण्यात आलेल्या होत्या. शहरातील अंतर्गत रस्ते व बाहेरील रस्ते यावरील धुळ साफ करण्यात न येत असल्याने वाहनाच्या सततच्या वर्दळीमुळे ही धुळ रस्त्यावर उडत असते. यामुळे धुळीचे प्रचंड प्रदुषण आहे. याउपर सततच्या खोदकामामुळे यात भरच पडत आहे. रस्त्यावर निर्माल झालेले खड्डे व्यवस्थीतरित्या बुजविण्यात येत नसल्याने तसेच मुरूम सारख्या घटकांचा वापर होत असल्याने या प्रदुषणात आणखीच भर पडत असते. यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे सामान्य नागरीक, फेरीवाले, रस्त्या दुर्तफा असलेले व्यावसायीक यांना या प्रदुषणामुळे आरोग्य बाधीत होत आहे. शहरातिल धुळीचे प्रदुषण नियत्रंणात आणण्याची मागणी इको-प्रोचे संस्थापक अध्यक्ष तथा, जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य बंडु सितारामजी धोतरे यांनी केली आहे. 
शहराबाहेरील रस्ते हे सार्वजनीक बांधकाम विभागाकडे आहेत या रस्त्याची सुध्दा अवस्था याच पध्दतीची आहे. या रोडवर सुध्दा धुळीचे प्रचंड प्रमाण असल्याने प्रदुषणाची तिव्रता अधिक आहे. या रोडवरील धुळ साफ करण्याकरिता संबधीत विभागाचा नियोजनपुर्वक कार्यक्रम असायला पाहीजे. तेव्हाच शहरातील धुळीची समस्या कायम स्वरूपी दुर होऊ शकते. याकरिता शहरातील प्रमुख रस्त्यासोबत खालील ठिकाणी उपाय योजना करणे गरजेचे आहे.  शहरातिल रस्ते सफाई दरम्यान रस्त्याच्या दुर्तफा जमा होणारी धुळ, रेती उचलण्यात यावे.  दर हप्तात एक/दोन दिवस कार्यक्रम ठरवून ‘ब्रशचा’ वापर करून रस्त्यावरील धुळ साफ करण्यात यावी.  शहरातील व बाहेरील रस्त्यावरील रस्ता दुभाजकाच्या बाजुला जमा होणारी धुळ साफ करण्यात यावे. लखमापुर परिसरात जुने कोल डेपो मुळे जमा असलेली ‘कोल डस्ट’ साफ करणे.  रस्त्याच्या बाजुला रिकाम्या जागेवर ‘सिंमेट ब्लाॅक’ लावण्याचे काम त्वरीत पुर्ण करणे.  वरोरा नाका ‘उड्डाणपुल’ बांधकामामुळे शहिद स्मारकामागुन पर्यायी रस्ता तयार करण्यात आलेला आहे, या रत्याचे त्वरीत डांबरीकरण करणे. बिनबा गेट ते रामनगर चैक पर्यतचा रस्ता त्वरीत डांबरीकरण करणे.  रस्त्याचे खड्डे बुजविण्याकरिता मुरूमचा वापरावर बंदी करावी. शहरात कुठलीही केबल लाईन करिता नालीचे खोदकाम रात्रीच्या वेळेत करावे, तेवढेच काम करावे जेवढे त्या रात्रीत खोदल्यानंतर बुजविता येईल.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.