Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर ०७, २०१३

चंद्रपूर-पुणे बस दिवाळीत सुरु करणार

चंद्रपूर- येथील बसस्थानकावर प्रवाशांच्या वाहनतळाचा प्रश्न, चंद्रपूर-पुणे बस आणि शहर बससेवेवर प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी दिली.
प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देणे हे आपले ध्यैय असून प्रवाशी दैवत माणून प्रत्येकांनी कार्यक्षमतेने सेवा द्यावी, प्रवाशांशी सौजन्याने वागावे, कामगार, अधिकारी समाधानी राहतील तेव्हाच प्रवाशांना योग्य सेवा देता येईल. सुरक्षित प्रवाशाची हमीची विश्‍वासार्हता बाळगावी. संघटनांनी महामंडळाचे हित जोपासावे. कामकाजाचे संगणीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादिचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, बालासाहेब साळुंखे, एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक अंबाडकर, चंद्रपूरचे विभागीय नियंत्रक महेंद्र भैसारे, मंगेश डांगे उपस्थित होते.
विदर्भातील चंद्रपूर विभाग हे सर्वात मोठे विभाग आहे. या विभागात १२ आगारांचा समावेश असून आदिवासीबहुल भाग असल्याने गडचिरोली येथे विभागीय कार्यालयाची आवश्यकता असल्याचे सांगितले. चंद्रपूर विभागातील गडचिरोली हे सर्वात मोठे आगार आहेत. चामोर्शी व आष्टी येथे बसस्थान उभारल्यास प्रवाशांना सुविधा उपलब्ध होऊ शकतो. बसस्थानक प्रस्तावित करण्यात आले असून जागेअभावी बसस्थानक उभारण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच विभागीय वाहतूक अधिकारी नाही. विभागीय वाहतूक अधिकार्‍याचा पदभार आगार व्यवस्थापकांना सांभाळावे लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. 
यावेळी राज्य परिहवन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे म्हणाले, गडचिरोली येथे विभागीय कार्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला असून कार्यालयाला लवकरच मंजूरी मिळणार आहे. कार्यालयाला लागणार्‍या कर्मचारी भरतीलाही मान्यता देण्यात आली असून बस जागे अभावी रखडलेले बसस्थानकाचे प्रश्न निकाली काढले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.