चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या संरक्षित वनात संशयितरीत्या फिरत असलेल्या मध्य प्रदेशातील एका इसमाला वन विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्याला न्यायालयाने २२ ऑक्टोबरपर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेशदिले आहेत.
मंगलप्रसाद पटेल असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो मध्य प्रदेशातील कोहरा (जि.कटनी) येथील रहिवासी आहे. घोसरी संरक्षित वनात तो संशयितरित्या फिरत असल्याचे एका वनरक्षकाला दिसले. त्याने लगेच याबाबत वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली.
त्यानंतर वन अधिकार्यांनी तेथे जाऊन त्याला अटक केली. त्याची विचारपूस केली जात असून तो नेमका या परिसरात कशासाठी फिरत होता, याचा अद्याप सुगावा लागलेला नाही. अद्याप कुठलीही माहिती उजेडात आली नाही. मात्र विविध शंका उपस्थित होत आहेत.यासंदर्भात ताडोबा कोअरझोनचे उपवनसंरक्षक सुजय डोडल यांना विचारणा केली असता, अटक करण्यात आलेल्या आरोपीची विचारपूस केली जात असून त्याच्याजवळ कोणतेही शस्त्र आढळले नसल्याचे ते म्हणाले.