Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०१, २०१३

२ ऑक्टोंबर ला प.पु. घोंगे महाराजांचा महासत्संग

चंद्रपूर दि. ०१ (प्रतिनिधी):
महाशक्ती कुंडलिनी जागरण समिती साधक शाखा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने  आर्शिवाद सभागृह, बल्लारपूर बायपास रोड शिव मंदीर वार्ड पेट्रोल पंप जवळ चंद्रपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पर्वावर दिनांक २ ऑक्टोंबर २०१३ रोजी सकाळी ०९ वाजतापासुन प.पु. सद्गुरु श्री. वसंतरावजी घोंगे महाराज तसेच गुरुपुत्र विलासदादा घोंगे यांच्या पावन सानिध्यात दिव्यदिक्षा, महासत्संग आणि शक्तिपातावर मान्यवरांचे प्रबोधन कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे.
मुक्तेश्वरी गुरुपिठ, निमगाव, ता. जि. वध्र्याचे गुरुपिठाधिश, शक्तिपाताचार्य, महासिद्धयोगी, क्रांतीकारी, योगीराज, परमपुज्य, सदगुरु श्री. वसंतरावजी घोंगे महाराज तसेच गुरुपुत्र विलासदादा घोंगे यांच्या पावन सानिध्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पर्वावर आर्शिवाद सभागृह, बल्लारपूर बायपास रोड शिव मंदीर वार्ड पेट्रोल पंप जवळ चंद्रपूर येथे सकाळी ०९ वाजता शक्तिपाताची दिव्यदिक्षा आणि १२ वाजता महासत्संग आणि शक्तिपातावर मान्यवरांचे प्रबोधन कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे.
सदर आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला मनशांती सोबतच आत्मबल वाढविण्याची नितांत गरज आहे. कुंडलिनी जागरण शक्तिपात दिक्षेमुळे सुद्ढ समाज निमाण होणार आहे. महासिद्धयोगी सदगुरु  श्री. वसंतरावजी घोंगे महाराज यांनी हे कार्य हाती घेतले आहे. सदगुरुच्या प्रेरणेतून कुंडलिनी जागरण समिती साधक शाखा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर जिल्हा वासीयांना या शक्तिपात दिक्षेचा लाभ मिळावा यासाठी या शिबीराचे आयोजन केले आहे. तरी समस्ता वयोगटातील, सर्व स्तरातील, सर्व धर्मातील, स्त्री-पुरुष अशा सर्वांनी अनुसरावा असा हा गुरुदेवांचा शक्तिपात दिक्षा, सत्संग, शक्तिपातावर प्रबोधन कार्यक्रम  असून यांचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन महाशक्ति कुंडलिनी जागरण सामिती साधक शाखा जि. चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.