Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर १९, २०१३

काठीसाठी न्यायालयाची तारीख पे तारीख

ठाणेदारांकडून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न

सावली : जानेवारी महिन्यात मेहा (बूज) येथे महिलेस झालेल्या मारहाण प्रकरणात वापरण्यात आलेली मकाठीङ्क पोलिसांनी न्यायालयात सादर न केल्याने सुनावणीला मतारीख पे तारीखङ्क मिळत आहे.
मेहा (बूज) येथील जिजाबाई कोलते या महिलेला गावातीलच माजी सरपंच देवाजी तरारे आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांनी काठीने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ठाणेदारांनी प्रारंभीपासून आरोपींच्या बचावासाठी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण वृत्तपत्रांनी उचलून धरल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. घटनेत वापरण्यात आलेली काठी न्यायालयाने सादर करण्याची सूचना पोलिसांना दिली. मात्र, सुनावणीदरम्यान एकदाही ही मकाठीङ्क पोलिसांनी आणली नाही. न्यायालयाने वारंवार बजावूनसुद्धा ठाणेदारांनी मकाठीङ्क सादर न केल्याने सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात येत आहे. हा सर्व प्रकार आरोपींच्या बचावासाठी ठाणेदारांकडून होत आहे.

पोलिस पाटलावरील कारवाई थंडबस्त्यात

महिलेस मारहाणीनंतर आरोपींना वाचविण्यासाठी तक्रार नोंदवून न घेतल्याप्रकरणी पोलिस पाटील लोमेश श्रीकोंडावार यांच्याविरुद्ध गावकèयांनी उपविभागीय अधिकाèयांकडे तक्रार केली होती. त्यावर चौकशीसुद्धा करण्यात आली. कर्तव्यात कसूर होत असल्याने पोलिस पाटलास पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पाथरी पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांनीही पोलिस पाटलाच्याही बचावासाठी काही नागरिकांवर दबाव आणून बयाण नोंदवून चौकशी अहवाल तयार केला. त्यामुळे पोलिस पाटलावरील कारवाई थंडबस्त्यात पडली आहे.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.