Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर १०, २०१३

गणेशाची विधिवत स्थापना

चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात आज अतिशय उत्साहात श्रीगणेशाची मनोभावे स्थापना करण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात ३५0 सार्वजनिक मंडळांनी गणेशाची विधिवत स्थापना केली. संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ४00 पेक्षा अधिक सार्वजनिक ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली.
सार्वजनिक गणेश मंडळांकडून नोंदणी तसेच पोलीस विभागाकडून लागणारी परवानगी घेण्याची प्रक्रीया अतिशय मंदगतीने होत असल्याने जिल्ह्यातील गणेश मंडळाचा नेमका आकडा आज स्पष्ट झाला नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी दुपारपर्यंत रामनगर पोलीस ठाण्यात परवानगीसाठी ६५, तर शहर पोलीस ठाण्यात २0 अर्ज दाखल झाले होते. दुर्गापूर पोलीस ठाण्यात १0 मंडळांनी परवानगीसाठी अर्ज दिले. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विसर्जनाच्या एक दिवसांपूर्वीपर्यंत अर्जाची प्रक्रीया सुरू राहते. रामनगर ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरी क्षेत्रात किमान १२0 ते १२५ व ग्रामीण क्षेत्रात १८ सार्वजनिक मंडळे गणेशाची स्थापना करतात. मात्र अद्याप या सर्वांचे अर्ज रामनगर पोलिसांना प्राप्त झाले नाहीत. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अपेक्षेपेक्षा अतिशय कमी अर्ज प्राप्त झाले आहेत.दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४0 ते ४५ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. मात्र त्यांपैकी केवळ १0 मंडळांनीच अर्ज दिले.
संपूर्ण जिल्ह्यात मनोभावे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. कुठे एक गाव एक गणपती, तर कुठे दोन गाव एक गणपतीची कल्पना प्रत्यक्षात साकार केली जात आहेत. मागील वर्षी एक हजार ४00 मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली होती. यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.