डॉ. मुरली मनोहर जोशी - शत्रुघ्न सिन्हावर बोलण्याचे टाळले
चंद्रपुर- देशाला चोहोबाजूंनी चीननं घेरलं आहे. रोज सीमेवर आक्रमण करीत आहे. त्यामुळं चीन हे सध्या देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे. देशाची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर राजकारण. देश वाचला तर सर्व वाचतील. त्यामुळं सर्व पक्षांना देशाची चिंता असली पाहिजे, असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं. एका कार्यक्रमासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.सध्या भाजपमधील राजकारण नरेंद्र मोदी यांच्याभोवती एकवटलं असताना भाजपमधील अनेक नेते त्यांच्या नावाला विरोध करीत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनीही उघडपणे त्यांच्यावर टीका केली. यासंदर्भात जोशी यांना छेडलं असता त्यांनी उपरोक्त उत्तर देऊन वादात उडी घेण्याचं टाळलं.पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाचेच नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी घरचा आहेर दिला आहे. मोदींसाठी दिल्ली अजून दूरच आहे, असे सिन्हा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. त्यावर डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी अधिक बोलण्याचे टाळले.
२०१४ च्या निवडणुका येतील तेव्हा येतील. पण सध्याचं देशाचं चित्र खराब आहे, असं सांगून राम मंदिराचा मुद्दा आता संपला आहे. पण निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काय-काय मुद्दे समाविष्ट होतील, हे येत्या काळात दिसेलच, असंही ते म्हणाले.