Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै ११, २०१३

भरसभागृहात बंदूक रोखली

चंद्रपूर : गेल्या काही वर्षांपासून निलंबित असलेल्या एका ग्रामसेवकाने प्रलंबित बिलांची रक्कम मंजूर करवून घेण्यासाठी चक्क संवर्ग विकास अधिकाèयावर भरसभागृहात बंदूक रोखल्याचा प्रकार घडला. गुरुवारी दुपारी पाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने सभागृहात बैठकीसाठी उपस्थितांत एकच खळबळ माजली.

चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत येणा-या म्हातारदेवी ग्रामपंचायतीतून निलंबित झालेला काळेवार नामक ग्रामसेवक प्रलंबित बिलांच्या रक्कमेला मंजूरी मिळविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चकरा मारत आहे. गतवर्षीच या मागण्यांना घेऊन त्याने उपोषणही केले होते. मात्र, ही रक्कम मंजूर न झाल्याने तो चांगलाच वैतागला आहे.प्रलंबित बिलांची रक्कम मंजूर करवून घेण्यासाठी आज त्याने कहरच केला. चक्क खांद्यावर बंदूक घेऊन तो पंचायत समितीत आला. प्रारंभी त्याने संवर्गविकास अधिकाèयांचे कक्ष गाठले. मात्र, तिथे कुणीही नव्हते. साहेब, शेजारच्या कृषक सभागृहात बैठकीत असल्याचे शिपायाने सांगितले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा सभागृहाकडे वळविला.तिथे पंचायत राज संदर्भात बैठक सुरू होती. अचानक कुणीतरी खांद्यावर बंदूक घेऊन आल्याचे बघून सभागृह उभा झाला. ग्रामसेवकाने सरळ मंचाकडे चाल करून संवर्गविकास अधिकारी हरीश माटे यांच्या डोक्यावर बंदूक लावली.मबिल मंजूर करता है की नही, नही तो बंदूकसे मार दुंगाङ्क अशी ङ्किल्मी डायलॉग त्याने मारली. शिवाय बंदूकीच्या घोड्यावर बोटही ठेवला. खटकन आवाज होताच संवर्गविकास अधिकाèयांच्या चेहèयावर चांगलाच घाम ङ्कुटला, तर सभागृहात उपस्थितांच्या हृदयाचे ठोके वाजू लागले. मग, काहींनी त्याची समजूत काढत बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या घटनेची तक्रार करण्यात आलेली नाही.

खांद्यावर बंदूक घेऊन आलेला हा ग्रामसेवक प्रशासकीय भवन, न्यायालयाच्या मार्गाने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने आला. त्यानंतर तो उपविभागीय अधिकाèयांच्या कार्यालयाकडून पंचायत समितीत आला. हा संपूर्ण परिसर पोलिसांच्या देखरेखीत असतानाही तो कुणालाच कसा दिसला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय एखादा व्यक्ती थेट बंदूक घेऊन आल्यानंतरही पोलिस प्रशासन गाठ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ही बंदूक मेल्यात ङ्कुगे ङ्कोडण्याची असून, यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून सोडले होते.

सरपंचावरही रोखली होती बंदूक
म्हातारदेवी येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक असताना या महाशयाने येथील सरपंचावर बंदूक रोखली होती. तेव्हा सरपंचाच्या तक्रारीवरून अटकही करण्यात आली होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.