चंद्रपूर- खाद्य परवान्याशिवाय हॉटेल्स चालविणाऱ्या तब्बल २३ जणांविरुद्ध महसूल विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली आहे . चंद्रपुरातील अनेक हॉटेल्स , रेस्टॉरन्ट , कॅफेटेरिया विना खाद्य परवाना सुरू आहेत .
हा प्रकार लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षकांना सहकारी अधिकाऱ्यांना संयुक्तपणे कारवाई करण्याचे आदेश दिलेत . अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली . कारवाई करण्यासाठी महसूल , पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके नेमण्यात आली . त्यानंतर एकाच वेळी सामूहिकपणे छापे घालण्यात आले . तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या हॉटेल चालकांना दंड ठोठावण्यात आला . यापुढेही या हॉटेल मालकांनी खाद्य पदार्थांची विक्री सुरू ठेवल्यास त्यांची प्रतिष्ठाने सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे .