Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २६, २०१३

विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करा - पालकमंत्री संजय देवतळे

 पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचे स्वागत
   चंद्रपूर दि.26- राज्य शंभर टक्के साक्षर व्हावे हे शासनाचे धोरण असून विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षक व पालकांची असून एकही विद्यार्थी शाळाबाहय राहता कामा नये असे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले.  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोहारा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आज पालकमंत्री संजय देवतळे  यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
    प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन लोहारा येथे करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माधवी खोडे,  शिक्षण उपसभापती मनोज आत्राम, जिल्हा परिषद सदस्या मीरा खनके, पंचायत समिती सदस्य दयानंद बनकुवाले, सरपंच उज्वला वरखेडे, शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुडे, संवर्ग विकास अधिकारी माटे, गट शिक्षणाधिकारी रामटेके, सुभाष गौर व विनोद दत्तात्रय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    लोहारा येथील शाळेत आज पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक व पुष्पगुच्छ देवून शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.  साक्षी गड्डमवार या विद्यार्थीचा आज वाढदिवस असल्याने पालकमंत्री देवतळे यांनी तिचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.  वंश मेश्राम, शिल्पा येडके, नंदनी आत्राम व प्रिया मोरकुटे या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी शाळेत पालकमंत्र्यानी स्वागत केले. 
    शैक्षणिक गुणवत्ता विकास, शंभर टक्के पटनोंदणी  व शुन्य टक्के गळती यासाठी शासनाने राज्यभरात शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला असून एकही विद्यार्थी शाळाबाहय राहू नये अशी प्रतिज्ञा पालकमंत्री संजय देवतळे यांनी पालकांना व नागरीकांना दिली.  विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवा, सुजान व सुदृढ नागरीक बनवा तसेच मुलांना कामावर पाठवू नका असे देवतळे यांनी यावेळी सांगितले.
    शिक्षण घेता घेता आनंद व आनंद घेता घेता शिक्षण ही बाब विद्यार्थ्यांच्या मनात रुजवा व विद्यार्थी शाळेत नियमित येवून चांगले नागरीक कशी बनतील यासाठी प्रयत्न करा असे आवाहन जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी याप्रसंगी केले.  आज सामाजिक न्याय दिवस असून मुलांना सामाजिक न्यायाचे महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशाप्रती प्रेम निर्माण करण्याचे कार्य करा असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी सांगितले.  मला काय बनायचे आहे ही बाब सुध्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवा आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी दिला.  यावेळी सरपंच उज्वला वरखेडे यांचे भाषण झाले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती खान यांनी केले.  तर श्रीमती लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.     


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.