Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून ०५, २०१३

यवतमाळमध्ये नंदिनी पारवेकर यांचा विजय

यवतमाळ - यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार नंदिनी पारवेकर यांनी आज (बुधवार) १५ हजारपेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला.
यवतमाळमध्ये आज मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी आठपासून धामणगाव मार्गावरील महिला तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. नंदिनी पारवेकर यांनी सुरवातीपासून आघाडी ठेवत हा विजय मिळविला. त्यांना ६२ हजार ५०९ मते मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार मदन येरावार यांना ४७ हजार २७६ मते मिळाली. नंदिनी पारवेकर यांचे पती निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
यवतमाळची पोटनिवडणूक भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची शक्तिपरीक्षा समजली जात होती. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून स्थानिक अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात हजेरी लावली होती. यवतमाळमध्ये यावेळी फक्त ३६.५७ टक्के इतकेच मतदान झाले होते. मतदारसंघामध्ये 3 लाख 21 हजार 559 मतदार असून यातील 2 लाख 3 हजार 955 मतदारांनी मतदानाचा हक्कच बचावलेला नाही. त्यामुळे केवळ 40.77 टक्के पुरुष तर 32.5 टक्के महिलांनी मतदान केले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.