पाच बिबट्यांना निसर्गमुक्तीची प्रतीक्षा : आहारावर महिन्याला दीड लाखांचा खर्च
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. २४ : एप्रिल-मे महिन्यात धुमाकूळ घालणाèया चार बिबट्यांना मागील दीड महिन्यापासून निसर्गमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे प्रत्येक बिबट्याला दिवसाला तीन किलो मटणाचा पाहुणचार वनविभाग करीत आहे. वनविभागाकडे सध्या यंदाचे चार आणि वर्षभरापूर्वीचा एक, असे एकूण पाच बिबटे असून, दिवसाला १५ किलो मटणाचा खर्च वनविभाग सोसत आहे.
ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यात दीड महिन्यात १२ जण ठार झाले. वनखात्याने अनुक्रमे १४ एप्रिल, २७ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मोहुर्ली, आगरझरी व मामला, पालेबारसा, माना टेकडी परिसरात qपजरे लावून चार बिबटे जेरबंद केले. यातील तीन बिबट्यांना मोहुर्ली येथे तर, एक बिबट रामबाग नर्सरीत जेरबंद करून ठेवण्यात आला आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून चार बिबटे जेरबंद असून, पाहुणे बनून वनखात्याचा पाहुणचार घेत आहेत. याशिवाय वर्षभरापूर्वी सोमनाथ येथून आणलेला एक बिबट वनविभागाच्या दावणीला बांधून आहे. यंदा जेरबंद झालेल्या चारपैकी नेमका कोणता बिबट हल्लेखोर आहे, याची शहानिशा न झाल्याने त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले नाही. त्यासाठी उपमुख्य वनसंरक्षक वन्यजीव मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती चारही जेरबंद बिबट्यांचा अभ्यास करून यासंदर्भातील अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस.डब्लू.एच. नकवी यांच्याकडे सादर करणार होती. मात्र, यासंदर्भातील अहवाल व निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे चार बिबटे qपजèयात अडकून पडले आहेत. या चारही बिबट्यांना जंगलात सोडण्यापूर्वी मायक्रोचिप व रेडिओ कॉलर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा प्रत्येकी खर्च तीन ते साडेतीन लाख असल्याने व कॉलर वनखात्याला मिळत नसल्याने बिबटे qपजèयात अडकून पडले आहेत. त्यामुळे वनखात्याला त्यांच्या पाहुणचाराचा खर्च पेलावा लागत आहे. एका बिबट्याला दिवसाला तीन किलो मटण लागते. एकूण पाच पाहुणे असल्याने पाच हजार रुपयांचे मटण दिवसाला पुरवावे लागत आहे. त्यासाठी प्रतिकिलो ३३८ रुपये दराने मटण खरेदी केले जात असून, पाच बिबट्यांसाठी दररोज पाच हजार ७० रुपयांचा खर्च मटणावर होत आहे. पशुवैद्यकीय अधिकाèयांच्या सूचनेनुसार बिबट्यांना केवळ बकèयाचे मटण पुरविण्यात येत असल्याचे वनाधिकारी राऊतकर यांनी सांगितले.
- ५-एकूण जेरबंद बिबट
- ३- किलो मटण एका बिबट्याला
- ३३८- रुपये प्रतिकिलो मटण
- १५-किलो मटण दिवसाला.....पाच बिबट्यांसाठी
- ५ हजार ७० रुपये दिवसाचा मटणाचा खर्च
- १ लाख ५२ हजार १०० रुपये- ३० दिवसांचा खर्च
----------------
बिबट्यांना निसर्गमुक्त करण्याचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे मोहुर्ली येथे चार बिबटे qपजèयात आहेत. त्यांना सोडण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.
- श्री. राऊतकर, वनपरिक्षेत्राधिकारी, मोहुर्ली.