Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०६, २०१३

हायटेकच्या नादात गुणपत्रिकेची प्रतीक्षा


द्वितीय सत्राची परीक्षा तोंडावर
गोंडवाना विद्यापीठातील भोंगळ कारभाराने विद्याथ्र्यांचे नुकसान

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
गडचिरोली, ता. : विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला वर्ष होत नाहीतोच या ना त्या करणाने विद्याथ्र्यांची कुचंबणा होत आहे. हायटेक विद्यापीठ बनविण्याच्या नादात प्रथम सत्र परीक्षेत निकालाचा टक्का कमालीचा घटला. परिणामी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी स्थापन झालेल्या विद्यापीठात विद्याथ्र्यांच्या अधोगतीलाच वाव मिळत आहे. त्यातच द्वितीय सत्राची परीक्षा तोंडावर असताना पहिल्याच सत्राची गुणपत्रिका अद्यापही हाती पडलेली नाही.
गोंडवाना विद्यापीठाची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली. या विद्यापीठातील सर्व कामे ऑनलाइन करण्यात आली. त्याचा सर्वस्तरावरील विद्याथ्र्यांना ङ्कायदा होईल, असे वाटत होते. मात्र, इंटरनेट सेवा उपलब्ध नसलेल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात या विद्यापीठाच्या हायटेकचा चांगलाच ङ्कटका बसला. प्रथम सत्राची प्रवेश प्रक्रिया संपत नाहीतोच हिवाळी- २०१२ची परीक्षा सुरू झाली. पण, अभ्यासक्रमाची पुस्तके उशिरा उपलब्ध झाल्यामुळे विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्यातही दिवाळीच्या एक महिन्यांच्या सुट्यात विद्याथ्र्यांना परीक्षा दिली. प्रारंभी विद्याथ्र्यांनी प्रथम सत्राची परीक्षा मनावर घेतली नव्हती. मात्र, विद्यापीठाने प्रथम सत्राच्या परिक्षेवरच द्वितीय सत्राचे भवितव्य टांगल्याने शैक्षणिक जीवन विद्याथ्र्यांच्या अंगावर आले आहे. प्रथमसत्राची परीक्षा झाल्यानंतर निकालाची प्रतीक्षा होती. मात्र, हा निकाल घोषित होण्यापूर्वीच द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी आवेदन पत्रे भरणे सुरू झाले. बि.. प्रथम वर्षाचा सत्राचा निकाल इंटरनेटवर सहा ङ्केब्रुवारी २०१३ ला लागला. मात्र, महिना लोटूनही गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. द्वितीय सत्राचे अभ्यासक्रम महाविद्यालयात विद्याथ्र्यांना शिकविण्यापूर्वीच उन्हाळी परीक्षेची तयारी सुरू झाली आहे.

अभ्यासक्रमाची पुस्तकेच नाहीत
गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या पुस्तके अद्यापही उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्याथ्र्यांना अभ्यास करताना अडचण निर्माण होत आहे. ज्या प्राध्यापकाकडे अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, त्यांनी वेळेत उपलब्ध करून दिली नाहीत. अनेक विद्यार्थी माहितीकरिता विद्यापीठाच्या दूरध्वनी संपर्क करतात. मात्र, तेथील कर्मचाèयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.