चंद्रपूर : महानगरपालिकेतफे करण्यात येणाèया शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १५) पार पडले. यात रस्ते, पाइपलाइन, कुत्र्यांसाठी कोंडवाडा आदी बांधकाम करण्यात येणार आहे.
यावेळी महापौर संगिता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समिती सभापपती नंदू नागरकर, नगरसेवक देवानंद वाढई, नगरसेवक सुनीता लोंढीया, सिव्हिल लाईन झोनचे सभापती रवि गुरुनुले, नगरसेवक राजेश रेवेल्लीवार, सुभेदिया कश्यप, प्रभाग झोन तीनचे सभापती अनिल रामटेके, नगरसेविका माधुरी बुरडकर, नगरसेवक विना खनके, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक अनिता कथडे, नगरसेवक अशोक नागपुरे, गजानन गावंडे, स्वीकृत सदस्य डॉ. महावीर सोईतकर, नगरसेवक करिमलाला काझी आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.
पंचशताब्दी निधीतून नळाच्या पाइपलाइन कामाचे भूमिपूजन, साई बाबा पाण्याची टाकी ते वैष्णवी अपार्टमेंटपर्यंत नळासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी ७४ लाख ४७ हजार ६६० रुपये, वैष्णवी अपार्टमेंट ते महसूल कॉलनी ओंकार नगरपर्यंत नळाचे पाईपलाइनसाठी ७० लाख १५ हजार ४९७ रुपये, दाताळा रोड ते ओकारनगरपर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ७२ लाख रुपये मंजूर झाले. या सर्व कामांचे भूमिपूजन दाताळा मार्गावरील जगन्नाथबाबानगर येथे पार पडले. शहराच्या सर्वांगिण विकास अंतर्गत गजानन मंदिर ते भावनाथ सोसायटीपर्यंत पाइपलाइनसाठी २६ लाख २० हजार ५७९ रुपये मंजूर झाले. मागास क्षेत्र अनुदान निधीतून नागपूर रोड ते गजानन मंदिरपर्यंत रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी ७७ लाख ९५ हजार ४० रुपये मंजूर झाले होते. महानगरपालिका निधीतून बासपास मार्गावर कम्पोष्ट खत डेपो येथे कुत्र्यासाठी कोंडवाडा बांधकामासाठी १० लाख ८३ हजार रुपये प्राप्त झाले. दलितेत्तर विकास योजनेतून गांधी चौकातील मिलन चौकापासून पॉलिटेक्निक कॉलेजपर्यंत रस्ता दुरुस्तीकरणासाठी ३५ लाख ८८ हजार ६६० रुपये प्राप्त झाले. या सर्व कामांचे भूमिपूजन झाल्याने आता बांधकामाला प्रारंभ होणार असल्याचे महापौर संगीता अमृतकर यांनी सांगितले