चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आयुष्य संघर्षात गेले. त्यांच्या संघर्षाचे ङ्कलित म्हणजे देश स्वतंत्र झाला. शांतीच्या मार्गाने त्यांनी अनेक आंदोलने केली. महत्त्वपूर्ण करारही केले. महात्मा गांधी यांचे हे कार्य चंद्रपूरकरांना येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनातून पाहता आले.
येथील अशोक कोटकर यांचे लहानपण पवनार येथील विनोबा भावे यांच्या आश्रमात गेले. लहानपणी त्यांच्यावर विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा होता. श्री. कोटकर यांना पवनार आश्रमातून महात्मा गांधी यांची दुर्मिळ छायाचित्रे भेट स्वरूपात मिळाली. गांधींजीची ही दुर्मिळ छायाचित्र कोटकर यांनी अनेकदा नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून दिलीत. सध्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातङ्र्के झरपट नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठाचे सहकार्य लाभत आहे. दोन्ही विद्यापीठातील विद्याथ्र्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनाची परिपूर्ण माहिती मिळावी, या उद्देशाने अशोक कोटकर यांनी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन लावले. या प्रदर्शनाला नागरिक, विद्याथ्र्यांनी भेटी दिल्या. छोट्याखानी कार्यक्रमात या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले. याप्रसंगी मुरलीमनोहर व्यास, वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे, गोविल मेहरकुरे यांची उपस्थिती होती.