Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०१, २०१२

मोहफुल आणि तेंदू

मोहफुल आणि तेंदूच्या पानांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाध्ये मोठ्या प्रमणात वणवा लावला जात असल्याचं चित्र दिसत आहे. ात्र, यावर प्रतिबंध घालण्यात वनविभाग अपयशी ठरल्यानं निसर्गाची मोठी हानी होत आहे. वणव्याध्ये आतापर्यंत सुमारे दोन हजार हेक्टरवरील जंगल जळून खाक झालं आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे अर्थकारण ज्या तेंदू संकलनावर अवलंबून आहे, तो तेंदू पत्ता चांगला यावा, यासाठी दरवर्षी इथल्या जंगलात मोठ्या प्राणात आगी लावल्या जातात. आगीनंतर तेंदूच्या झाडांना कोवळी पानं फुटतात. ही पान तेंदू ठेकेदारांना ङ्खायाची ठरतात. याशिवाय जनिमीवर पडलेली मोहफुले ठळकपणे दिसावी, यासाठीही आगी लावल्या जातात. लोकांनी आपल्या स्वार्थासाठी चामोर्शीसह इतरही तालुक्यात मोठ्या आगी लावण्याचं का चालवलं आहे. यात उधप्रतिचं सागवानही भक्ष्यस्थानी पडत आहे. कोट्यवधींची वनसंपदा आणि वन्यजीव या आगीत होरपळून निघत आहेत. पर्यावरणवादयनी आवाज उठवला, तर त्यांचं ऐकण्याची मानसिकताही अधिकार्‍यांध्ये नसल्यानं आगीचं  तांडव काय आहे. जंगलात सर्वत्र भीषण वणवा लागला असताना त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी जे उपाय केले जात आहेत, ते पाहिले, तर वनविभागाची अनास्था सहजपणे लक्षात येते. वनविभागानं इथल्या र्कचार्‍यांना आगीशी लढण्यासाठी झाडू आणि धुक्यापासून संरक्षणासाठी हेल्ेट दिलेले आहेत. या दोन साहित्याच्या बळावर जंगलाचं रक्षण करण्याची जबाबदारी र्कचार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली वनविभागाकडे वणवा प्रतिबंधक गाड्याच नाहीत. त्याुळं वणवा केवळ झाडूच्या भरवशावर विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता वनविभागानं लोकजागृती करण्यासाठी पत्रके छापली असून, त्याचं वितरण गावकर्‍यांना केलं जात आहे.ार्च हिना संपला तरी तेंदूचा लिलाव अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळं इथल्या लोकांना रोजगार नाही. याच कारणामुळं आता लोकांनी चोरीछुपे स्वतःचं तेंदू संकलनाची मोहिम  उघडली आहे. वणवा लागण्यामागे हेही एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.