Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर ०४, २०११

सात वर्षांत साडेतीन लाख पर्यटक


चंद्रपूर - जागतिक नकाशावर नाव असलेल्या येथील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मागील सात वर्षांत तीन लाख 84 हजार 923 पर्यटकांनी भेट दिली असून, नऊ कोटी 36 लाख सात हजार 824 रुपयांचा महसूल ताडोबा व्यवस्थापनाला प्राप्त झाला आहे. मागील सात वर्षांत "वाघोबा'च्या दर्शनासाठी पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच गेली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत 78 हजार 881 पर्यटकांनी भेट दिली आहे. आता बफरझोनमध्ये निसर्ग पर्यटनाची सोय होणार असल्याने येथे पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 
यावर्षी या ताडोबा प्रकल्पास 78 हजार 881 पर्यटकांनी भेट दिली आहे. या आर्थिक वर्षापर्यंत हा आकडा एक लाखाच्या घरात जाईल, अशी शक्‍यता आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनमध्ये पुढील मोसमापासून निसर्ग पर्यटन सुरू केले जात आहे. सध्या त्याची जोरात तयारी सुरू आहे. यासाठी निवडलेल्या 11 रस्त्यांच्या सुधारणेसाठी जिल्हा विकास नियोजन मंडळाने निधीही मंजूर केला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान व अंधारी अभयारण्य यांचे एकूण क्षेत्र 625 चौरस किलोमीटर आहे. या प्रकल्पाला लागून वनविभागाचे तीन विभाग आहेत. त्यांच्या ताब्यात सध्या एक हजार 150 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र आहे. हाच भाग बफरझोन म्हणून जाहीर झाला आहे. या झोनमध्ये 79 गावे वसली आहेत. या गावांतील लोकांना निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून आता रोजगार उपलब्ध होणार आहे. निसर्ग पर्यटनासाठी एकूण 50 किलोमीटरचे रस्ते निर्माण केले जात आहेत. यामध्ये केसलाघाट ते सोमनाथ हा 25 किलोमीटरचा, तर नवरगाव चौकी-देवाडा-मोहर्ली हा 15 किलोमीटरचा मार्ग झपाट्याने विकसित केला जात आहे. निसर्ग पर्यटन सुरू करण्यामागे बफरझोनमधील गावांचा विकास करणे, हा एकमेव उद्देश आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जो निधी शासनाकडे जमा होईल, त्यातून गावांतील पायाभूत सोयीसुविधा निर्माण करणे, हे महत्त्वाचे कार्य असणार आहे. यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची संख्या आता आणखी वाढणार आहे.


वर्ष पर्यटक
03-04.........
35,944
04-05........ 36,325
05-06............... 35,640
06-07............... 43,345
07-08............... 61,790
08-09............... 68,183
09-10.............. 1,03,593
10-11.................. 78,881............ (ऑगस्ट महिन्यापर्यंत)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.