Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट २३, २०१०

चंद्रपुरातील अतिवृष्टिग्रस्तांना शासनाकडून नुकसानभरपाई

मुख्य पान

ऍग्रो स्पेशल
^^^^^^^^^^^^^^
Sunday, August 22, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: rain, chandrapur

चंद्रपूर - यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात अतिवृष्टी, वीज आणि अन्य घटनांत १५ लोकांचे बळी गेले असून, २४ जनावरांचा मृत्यू झाला. याशिवाय एक हजार घरांची पडझड झाली असून, अतिवृष्टिग्रस्तांना शासनाच्या वतीने १४ लाखांची नुकसानभरपाई देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील इरई, झरपट, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जुलैअखेरीस तसेच पाच ते सात ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यात नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा जिल्ह्यात आतापर्यंत पंधरा लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २४ जनावरे मृत्युमुखी पडली. यामध्ये वीज पडून १२ लोकांचा, आगीने एकाचा तर पुरात वाहून गेल्याने आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सहा बैल, चार गाई, तीन म्हशी व सात बकऱ्या अशी वीस जनावरे मृत्युमुखी पडली.
वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख असे बारा लाख व पशुपालकांना प्रत्येकी दहा हजार असे आतापर्यंत चौदा लाखांचे वाटप जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पाच ते सात ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत एका व्यक्तीचा व चार बैलांचा मृत्यू झाला. पावसामुळे घरांची पडझड आणि पूल व रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर-बल्लारपूर, चंद्रपूर-नागपूर, चंद्रपूर- मूल, चंद्रपूर-गडचिरोली या प्रमुख रस्त्यांचीही बरीच हानी झाली आहे.
या वर्षी अतिवृष्टीने सिंदेवाही, चिमूर, बल्लारपूर व चंद्रपूर या चार तालुक्‍यांत घरांची सर्वाधिक पडझड झाली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत ६९७ घरे पूर्णपणे पडली होती. दरम्यान, नुकसानग्रस्तांना विविध योजनेअंतर्गत मदत देता यावी, यासाठी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी अतिवृष्टीचा अहवाल तयार करून नागपूर येथे आयुक्त कार्यालयात पाठविला आहे.



पिकांचे नुकसान पाच टक्के

यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचेही नुकसान झाले आहे; मात्र कृषी विभागाने हे नुकसान अवघे पाचच टक्के असल्याचा अहवाल तयार केल्याने सर्वेक्षणावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. या वर्षी नदीकाठावरील अनेक शेतातील पिके नष्ट झाली. दरम्यान, पिकांवर झालेल्या लष्करी अळी व उंट अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Agrowon - India's First Agro DailyAbout Us

Contact Us

http://www.agrowon.com/
epaper.agrowon.com

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.