Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर ३०, २००९

चुभन तुम्हारी भी कम होगी...

Wednesday, December 30, 2009

सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - दु:खांचे डोंगर झेलणाऱ्या अपंग सुनील जोशी यांच्या आयुष्यातील तीळभर वेदना कमी करण्याचा प्रयत्न ब्रह्मपुरीतील एका दात्याने केला. हे करताना मात्र ते प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले. त्यामुळे या मदतीचे मोल वाढले आहे. "चुभन तुम्ही भी कुछ कम होगी... किसी के पाव का काटा निकालकर तो देखो' दुसऱ्यांचे दु:ख कमी करण्याच्या प्रयत्न केल्यास आपले दु:ख कमी होण्याचे समाधान मिळते, याची अनुभूती सध्या ते दानशूर व्यक्ती घेत असावे...

एकेकाळी भोजनालयात स्वादिष्ट भोजन देणारा संजय जोशी नशिबी आलेल्या अपंगत्वामुळे रस्त्यावरच आयुष्य जगतोय. काखेत दोन कुबड्यांचा आधार घेऊन भीक मागून जीवनाचे चक्र फिरविणाऱ्या सुनीलची व्यथा "सकाळ' चंद्रपूर टुडेच्या "रस्त्यावरच आयुष्य' या सदरातून 18 डिसेंबर 2009 च्या अंकात मांडण्यात आली. सुनील वामनराव जोशी 45 वर्षांचे आहे. अविवाहित. तरुणपणात कुटुंबाला आधार म्हणून तो जटपुरा गेट परिसरातील संजय भोजनालयात स्वयंपाकी म्हणून कामाला होता. त्याच्या शैलीने स्वादिष्टपूर्ण व चवदार पदार्थ तयार व्हायची. मात्र, नियतीने काही वेगळाच डाव खेळला. ग्राहकांच्या जिभेचे चव पुरविणाऱ्या त्या हातांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. त्याच्या पायांना अपंगत्व आले. त्यामुळे रोजगार बुडाला आणि नशिबी भिक्षापात्र आले. आता वृद्ध वडील आणि आईसुद्धा जग सोडून गेली. हक्काचे घर नाही. जटपुरा गेटसमोरील वडाच्या झाडाखालीच तो राहतो.

ही व्यथा वाचून ब्रह्मपुरीच्या एका दानशूर कुटुंबाने मदतीचा हात दिला आहे. मात्र, आपले नाव "त्या' व्यक्तीला आणि कुणालाही माहीत करू नका, अशी विनंतीही या दात्यांनी केली. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात येणाऱ्यासाठी "दान' करणाऱ्यांच्या मांदियाळीत या व्यक्तीचे महत्त्व आणखी वाढले आहे. वर्तमानपत्रात संजयची व्यथा प्रकाशित होताच ब्रह्मपुरी येथील "त्या' अज्ञातदात्याने "सकाळ' कार्यालयाशी संपर्क साधला.

त्यानुसार, आनंदवन येथून तीनचाकी सायकल मागविण्यात आली. आज सायंकाळी जटपुरा गेटसमोरील वाहनांच्या वर्दळीतच सुनीलचा भावपूर्ण सत्कार करीत सायकल भेट देण्यात आली. एका अज्ञात कुटुंबाने दिलेली ही मदत आणि सायकल पोहोचविण्यासाठी विकलांग सेवा संस्थेचे श्रीराम पान्हेरकर, खुशाल ठलाल, बंडू धोत्रे यांनी सहकार्य केले. संबंधित बातम्या
स्वतंत्र विदर्भावरून युतीत तणाव नाही - खडसे
'काळ्या जादू'ची गडेगावात 'दहशत'
तीन सभापतिपदे कॉंग्रेसकडे
विदर्भात पावणे दोन लाख बालके पोषण आहारापासून वंचित?
घरपोच योजने'ची सुरवातच नाही?

प्रतिक्रिया

On 12/30/2009 9:45 AM qsuman said:
वन ईदियत ची प्रतिक्रिया वाचण्यासारखी आहे. भारतीय मनोवृत्तीचा नमुनाच. एखाद्याने मदत केली त्याचे कौतुक नाही. ती कशी कमीच आहे, आणखी काय करायला हवे या बद्धल सल्ला मात्र सर्व देतात. यातून स्फूर्ती घेऊन, इतरांनीहि पुढे येऊन मदतीचा हात देण्यास काय हरकत आहे? सल्ला देणार्यांनी स्वतः काही करायचा विचार केला आहे काय?

On 12/30/2009 7:45 AM बाजीप्रभू said:
अशी लोक खरच कमी आहेत.....

On 12/30/2009 1:10 AM One Idiot from Three ... said:
सायकल देऊन काय उपयोग ? जर छान जेवण करतो तर स्वयंपाकी म्हणून कुठे तरी नोकरी दिली पाहिजे, सायकल बरोबर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.