Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सहल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सहल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, मे ०३, २०२१

फेरफटका कुशिरे जोतीबाचा

फेरफटका कुशिरे जोतीबाचा

 फेरफटका कुशिरे जोतीबाचा 


दि. ३ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3xKWUVU
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवीरपीठास धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. यातीलच धर्मस्थळांपैकी वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक व ऐतिहासिक ऐश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्राचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.

फेरफटका कुशिरे जोतीबाचा

पायी जाण्यासाठी इतिहास कालीन मार्ग आहे तो निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कुशिरे गावातून. कोल्हापूरकर मॉर्निंग वॉकिंगसाठी कुशिरे फाटा ते जोतिबा हा मार्ग दर रविवारी आवर्जून निवडतात. इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी साधारणतः या मार्गाने १००० ते १५०० भाविक जोतीबाच्या दर्शनाला जातात. जोतीबा यात्रेचा मुख्य दिवस आणि पाच खेट्याच्या काळात साधारणतः पाच हजारहुन अधिक भाविक या मार्गावरून जोतिबाच दर्शन घेतात. पाकाळणीच्या उत्सवाला सुद्धा हा आकडा दोन हजारांच्या वरती असतो.              
 🔹मार्ग 🔹
कुशिरे गावांपर्यंत बरेच लोक चारचाकी किंवा दुचाकीवरुन पोहचतात.  आपली गाडी पार्क केल्यानंतर जोतिबा डोंगराच्या दिशेने पायी प्रवास सुरु होतो. काहीजण शिवाजी पूलापासूनच चालायला सुरवात करतात. आजूबाजूला असणारी झाडी , पक्ष्याची किलबिल , मोरांचे आवाज यामुळे प्रवासातील थकवा दूर होऊन आनंद आणखी दुणावतो. वाटेमध्ये येणारे चढ उतार आपल्या शारीरिक क्षमतेची कसोटी घेत राहतात. तर वाटेत लागणारी छोटीछोटी मंदिरे इतिहासाच्या पाऊलखुणा जपत असल्याचा भास करून देतात., वाटेमध्ये असणार्या  करवंदाच्या जाळ्या आणि कैरीच आस्वाद घेत लोक प्रवास करतानाही पाहायला मिळते.कुशिऱ्यातून जवळपास सहा कि.मी.अंतरावर असलेल्या प्रवेशद्वार कमानीपाशी क्षणभर विश्रांती घेवून अनेकजण पुढचा प्रवास निश्चित करतात. इथून दरीमध्ये  दिसणार वाहत्या नदीच पाणी आणि फोर्ट स्कूलच नयनरम्यदृश्य पाहिले की आलेला सगळा थकवा नाहीसा होतो. जोतिबाच्या नावाचा गजर करत पुन्हा थकलेली पावलं जोमाने मंदिराकडे जायला वळतात.
मुख्य मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूला लागणारी प्रसादांची, हारांची दुकाने नकळत आपल लक्ष वेधून घेतात. कळसाच दर्शन घेतल्यानंतर गुलालात  न्हाऊन निघत आपण मुख्य मूर्तीच दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करतो.  साधारणत तासभरामध्ये आपण डोंगर उतरतो आणि कुशिरे गावात पोहचतो.  परतीच्या प्रवासामध्ये  तिथे आपले  स्वागत होते ते ताज्या भाज्या विकत असलेल्या गावकरी स्त्रियांकडून. प्रत्येकांनीएकदा तरी अनुभवायला हवा असाच कुशिरे ते जोतिबाचा अविस्मरणीय प्रवास आहे. भक्ती मार्गाबरोबर स्वत:ची आरोग्यावृधी असा दुहेरी हेतू यात सहज साध्य होतो.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

मंगळवार, डिसेंबर २२, २०२०

इतिहास... मागे वळून पाहताना...  कुरुंदवाड.. ________________________

इतिहास... मागे वळून पाहताना... कुरुंदवाड.. ________________________



इतिहास... मागे वळून पाहताना...

कुरुंदवाड..
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेलं एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर...
      ब्रिटिश राज्याच्या वेळी कुरुंदवाड हे शहर भारताचे एक राज्य होते १७७२ मध्ये मुंबई च्या डेक्कन विभाग अंतर्गत आणि दक्षिण मराठा जहागिरी चा हिस्सा बनविण्यासाठी श्रीमंत पेशव्यांनी अनुदान द्वारे हे राज्य बनिवले .१८५७ मध्ये ब्रिटिश सरकारने व्यापारासाठी या राज्याचे दोन भाग केले ज्या मध्ये शेडबाळ हे एक तयार झाले . दोन्ही राज्याचे प्रमुख ब्राम्हण असलेने ते पटवर्धन सरकार परिवाराशी संबंधित होते.

( सदरची वरील माहिती गुगल वरून )

अशा या ऐतिहासिक शहरामध्ये ऐतिहासिक वारसा जपणारे एक आजही सुस्थितीत पहावयास मिळते, ते मंदिर म्हणजे #श्री_राघवजी_मंदिर" हे मंदिर त्या काळाचे शासक श्रीमंत रघुनाथ राव निळकंठ उर्फ दादासाहेब पटवर्धन यांनी शालिवाहन शके १७१७ मध्ये बांधले आणि त्या पुढील सभामंडप चे बांधकाम त्यांचे पणतू श्रीमंत रघुनाथ राव केशव व त्यांच्या पत्नी सीताबाई साहेब यांनी शके १८०२ मध्ये पूर्ण केले.
       सुंदर रेखीव आणि भक्कम दगडांनी तसेच सागवानी लाकडा पासून अप्रतिम नक्षीदार काम करून दोन मजली भव्य सभामंडप नयनरम्य आणि पाहण्याजोगे आहे. मंदिर परिसरात सुंदर तुळशी वृंदावन हि चांगल्या स्थितीत आहे. या मंदिराच्या सभामंडप मध्ये एक भले मोठठे लाकडी झाकण लावुन कुलूप बंद केलेले एक भुयारी मार्ग सारखे छिद्र आढळले. तेथे आलेल्या एक भाविकाला विचारले असता तो सहजच म्हणाला की, "हा भुयारी मार्ग पलीकडे असलेल्या मोठ्ठया दगडी विहिरीकडे जातो " पण सम्बधी आणखी चौकशी केली पण कोणालाही याची माहिती नाही. 
       श्री दत्त क्षेत्र नृसिंहवाडी या बाजूने कुरुंदवाड शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ असा सुंदर पुतळा नजरेत भरतो. त्यानंतर इतिहासाची साक्ष देणारे आजच्या काळात आपले अस्तित्व टिकवून असणारे दोन बुरुज आपले स्वागत करतात. मंदिराच्या मागे असणारी भली मोठी आयताकार  दगडी विहीर विलोभनीय आहे त्याच्या दगडी पायऱ्या , पाणी ओढण्यासाठी दगडी मोट चे अवशेष दिसतात. 

( आज या विहिरींची अवस्था खराब असली तरी सर्व कुरुंदवाड वासीयांनी एकत्र येऊन याचे संवर्धन केलेस एक इतिहासाची साक् देणारा वारसा नवीन पिढीला पहावयास मिळेल )

        अजूनही जुन्या कुरुंदवाड  शहरात जुनी बांधकामे , दगडी  वाडा आणि पुरातन श्री दत्त मंदिर आहे.

     श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि खिद्रापूर येथील पुरातन कोपेश्वर मंदिर पहावयास महाराष्ट्रातून अथवा जगभरातून येणाऱ्यानीं कुरुंदवाड शहरातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वास्तू एकवेळ आवश्यक पहाव्यात ....
https://bit.ly/31T2A0y

शनिवार, जुलै १८, २०२०

हलशी- बेळगाव सुंदर पर्यटनस्थळ

हलशी- बेळगाव सुंदर पर्यटनस्थळ

हलशी-बेळगाव ‘पर्यटनस्थळ’ दर्जा...तरीही दुर्लक्षित


सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले हलशी गाव म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील एक अतिप्राचीन गाव.
सभोवतालची पर्वतराई आणि गर्द हिरवी वनराई यांनी नटलेला हा परिसर! एकवीस वेळा क्षत्रिय कुलाचा नाश करणार्या जमदग्नीसुत परशुरामाच्या क्षेत्रातील एक पवित्र स्थळ म्हणूनही हलशीला ओळखले जाते. त्याहीपेक्षा हलशीला मोठे भाग्य लाभले आहे, ते म्हणजे कदंब अधिपती पलसी देशाची राजधानी म्हणून. ‘पलासिका’ बारा हजार प्रांतांची हलशी राजधानी होती. असे असले तरी आजच्या लोकशाहीत प्रशासनाकडून हलशी अद्यापही दुर्लक्षितच आहे
देशातील पुरातन स्थळांना शासनाने पर्यटन स्थळांचा दर्जा देऊन विकसित केले आहे. हलशी गावदेखील पुरातन असून, शिवाय शेकडो कदंबकालिन मंदिरांची येथे मांदियाळी असल्याने या गावाला केंद्र सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. हलशी गाव आज जगाच्या नकाशावर जरी दिसत असले, तरी येथे अनेक सुविधांची वानवा आहे. गेल्या तीन वर्षांपासून कर्नाटक शासनाने कदंबोत्सवाला चालना देऊन गावचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राजकीय पुढार्यांना हा कदंबोत्सव केवळ मिरवून घेण्याचे व्यासपीठच वाटते. वर्षातून एकदा गावावर आश्वासनांची खैरात करून तोंडाला पाने पुसली जातात. यामुळे हलशी पर्यटनस्थळाचा विकास केवळ आश्वासनांवरच हवेत अधांतरी तरंगू लागला आहे.
चार मंदिरे ताब्यात
गावातील शेकडो मंदिरांपैकी प्रमुख चार मंदिरे केंद्र सरकारने ताब्यात घेतली आहेत. यामध्ये श्रीनृसिंहवराह, श्री रामेश्वर, कलमेश्वर व सुवर्णेश्वर मंदिरांचा समावेश आहे. तर उर्वरित शेकडो मंदिरे राज्य सरकारने ताब्यात घेतली आहेत. केंद्र सरकारने चारीही मंदिरांचे पुरातन विभागामार्फत नूतनीकरण केले आहे. राज्य सरकार मात्र, अद्याप पाऊल उचलण्यास दिरंगाई करीत आहे. शिवाय पर्यटन खाते हलशीच्या बाबतीत म्हणावे तितके लक्ष पुरवित नसल्याने कदंबांची पलासिका अद्यापही दुर्लक्षित राहिली आहे. याकरिता राजकारणी व प्रशासनाने प्रथम हलशीचे महत्व जाणून घेेणे गरजेचे आहे.
कदंब राजवट देशातील सर्वात मोठी राजवट म्हणून ओळखली जाते. सुरूवातीला कदंबांच्या सत्तेखालील प्रांताचे सामान्यत: बारा भौगोलिक विभाग पाडले गेेलेे.
धारवाड नरेंद्रपासून हलशीबेळगावपर्यंतच्या भागाला ‘सुद्धीकुंदूर’ म्हणून ओळखले जाई. या विभागातील हलशी हेे एक महत्वाचे ठिकाण होते. या प्रांताची ही राजधानी म्हणून नावारूपाला आली. आज किमान पाच जिल्ह्यांनी व्यापलेला प्रांत या राजधानीच्या अधिपत्याखाली येत होता. उत्तरेला कराडसांगलीचा भाग, पूर्वेला बदामीच्या अलिकडील विजापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग, आग्नेयेला धारवाडहुबळी, कलघटगी, कुंदगल, तालुके, दक्षिणेला हनगलहल्याळ, सुपा (जोयडा) तालुके, पश्चिमेला गोव्याची संपूर्ण हद्द तर वायव्येला सिंधुुदुर्ग जिल्हा या राजधानी अधिपत्याखाली येत असे. त्यानंतर राजा रविवर्मा कदंबाच्या काळात (इ. स. 485519) उत्तरेला नर्मदा नदीपर्यंतचा भूभाग या राजधानीच्या अखत्यारित होता.
त्यानंतर गोवा कदंबाच्या काळात मिरज 3000, कुंडी 3000, कर्हाड 4000 या प्रांतांचा कारभार स्वतंत्र झाल्याने हलशी प्रांतांची संख्या 1100 पर्यंत खाली आली. याकाळी 1500 खेड्यांचा प्रांत जिल्हा म्हणून ओळखला जाई. पलासिका, कुंदूर, मावळ (महाराष्ट्रातील पश्चिमेचा भाग) मुर्हापासून 70 कि. मी. पर्यंत पसरलेला रायगडपर्यंतचा भाग, मिरज व कुंडी इत्यादी भाग हलशीच्या अधिपत्याखाली आला होता. या पलासिका जिल्ह्यात कापोली, असोगा, खानापूर, कलगिरी ही काही महत्वाची गावे होती.
पनासिका पलासिका
बेळगावच्या दक्षिणेला अवघ्या 42 कि. मी. वर असलेल्या या गावाला प्राचीनकाळी ‘पनासिका’ या नावाने ओळखले जाई. पनास म्हणजे फणस व ईका म्हणजे नामप्रत्यय आहे. फणस वृक्षांनी व्यापलेला हा भाग असल्याने पनासिका नाव पडले असावे, असे सांगण्यात येते. त्यानंतर दुसर्या नावाच्या बाबतीतही पुन्हा एका वृक्षाचाच उल्लेख येतो. तो वृक्ष म्हणजे पळस (पनसुडा). वर्षभरातील हिरवेगार रूप टाकून शिशिरात धरणीला केसरी, रक्तवर्णी रंगछटांचा साज चढवून महिनादीड महिना फुलांचा राजा म्हणून मिरविणारा पळस! राजा मृगेश वर्मा याने पाचव्या शतकात हलशीला ‘पलासिका’ म्हणून नाव दिले. आजही हलशीच्या सभोवताली पळसाच्या वृक्षांची विपूल गर्दी पहावयास मिळते. जवळजवळ सहा शतके पलासिका नावाने संबोधल्यानंतर अकराव्या शतकात पलासिका शब्दात बदल होऊन कॅनरसे भाषेत ‘पलासिके’ म्हणून हलशीचा परिचय झाला. गुवळदेव कदंब तिसरा याने हलशीला पलासिके म्हणून नाव दिले.
पुढे तिसरा जयकेशी (इ. स. 11201125) याने धारवाड शिलालेखात ‘प’ चे ‘ह’ व ‘क’ चे ‘ग’ करून ‘हलसीगे’ असे संबोधले. त्यानंतर परमादीदेव व विजयादित्य यांनी हलशी शिलालेखात पळसी व पनसी नावाने गावाची नवी ओळख करून दिली. शिवाय तिसर्य जयकेशीने मानगुंदी शिलालेखात ‘पलसुगे’ म्हणून लिहिले आहे. त्यानंतर पुन्हा हलसीगे होऊन कालांतराने हलशी असे नामकरण झाले आहे. कदंब राजांनी या राजधानीतून सुमारे नऊशे वर्षे आपला राज्यकारभार हाकला आहे. यामुळे शासनाने या गावचा पूर्वेतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.
नृसिंहवराह मंदिर हे अतिजागृत मंदिर म्हणून मानले जाते. हे मंदिर म्हणजे कदंब वास्तूशास्त्राचा विकसित नमुनाच आहे. जसे मंदिर विस्तृत तसा परिसरही विस्तृत आहे. कदंबांची किर्ती पताका फडकावित हे मंदिर गेली आठ शतकं उभे आहे. मंदिराच्या भक्कम दगडी भिंती पांढर्या ग्रॅनाईटच्या आहेत. अकरा पायर्यातून वर गेलेले पिरॅमिडकृती गोपूर व त्यावर कळस याची प्रशस्त बांधणी पाहून आजच्या विज्ञानयुगातील संशोधकही तोंडात बोट घालतात. यावरूनच कदंबाची शिल्पकला आणि कल्पकता किती उच्चदर्जाची होती, याची कल्पना येते.
देवालयात प्रवेश करताच एक शिलालेख दृष्टीस पडतो. तोच इतिहासात हलशी शिलालेख म्हणून ओळखला जातो. त्यानुसार बाराव्या शतकातील परमादीदेव कदंब याच्या विनंतीनुसार ‘मरयोगी’ नावाच्या सत्पुरूषाने हे देवालय बांधून श्री नृसिंह देवाची प्रतिष्ठापना केली आहे. मंदिराला दक्षिणोत्तर असे दोन दरवाजे आहेत. पूर्वदिशेला एक दरवाजा होता. तो बुजवून तिसर्या जयकेशी कदंब याने नृसिंह व आदीनारायणासमोर वराहदेवाची प्रतिष्ठापना केली आहे. यामुळे पूर्वप्रवेशद्वार बंद करावे लागले. मंदिरात चालुक्य बांधकाम पद्धतीचा प्रभाव दिसून येतो. सभागृहात अखंड गुळगुळीत पाषाण आणि केंद्रस्थानी कासव आहे. वर्तुळाकार कोरलेले अखंड दगडी खांब छताला तोलून धरण्यासाठी दिमाखात उभे आहेत.
♍रामेश्वर मंदिर♍
नृसिंहवराह मंदिराबरोबर पर्यटकांचे आवडते मंदिर म्हणून रामेश्वर मंदिराला ओळखले जाते. हलशीच्या नैऋत्येला दोन कि. मी. अंतरावरील उंच टेकडीवर सृष्टीचा कल्याणकारी ईश्वर रामेश्वराच्या रूपाने स्थानापन्न झाला आहे. या परिसराला रामतीर्थ म्हणून ओळखले जाते. या मंदिराकडे जाणारी पाऊलवाट हलशी गावाबाहेरील माळरान सोडून डोंगरमाथ्याकडे जसजशी जाऊ लागते, तसा वार्याच्या मंद झुळुकासोबत रानफुलांचा राकट वास संवेदित करून जातो. टेकडीवर चढत जावे तसे शुद्ध मोकळी हवा कानाशी गुंजण घालते. अवघ्या पंधरा मिनिटात आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. मंदिराची पूर्णाकृती आपल्या नजरेत येते.♍ रामेश्वर मंदिर म्हणजे एक छोटा भागारा, एक देवडी आणि साधारणत: पंधरा बाय पंधरा फूट आकाराच्या मापाचे मुखमंडप! गाभार्यावर पिरॅमिडकृती गोपूर आहे. त्यावर गोल गुळगुळीत कळस आहे. गोपुराचा काही भाग कमानीसारखा बाहेर आलेला असून, त्यावर सिंहाच्या मुखाकृतीचे शिल्प आहे. उजवा पाय वर उचललेला सिंह हे कदंबांचे राजचिन्ह आहे.
मंदिर गाभार्यात ईश्वरलिंग व देवडीत नंदी विराजमान आहे. मुखमंडप पूर्ण असूनदेखील त्याखाली बसण्याचे भाग्य या भोळ्या वृषभाला मिळाले नाही. मुखमंडपात देवडी भिंतीत दोन कोनाडे आहेत. डाव्या कोनाड्यात नागयुग्म तर उजव्या कोनाड्यात महिषासूरमर्दिनीची सुबक रेखीव मूर्ती आहे. महिषासुराला मारणार्या या मर्दिनीचे वाहन सिंह बाजूला आहे. उत्तर कोनाड्यात ब्रम्हशिल्प आहे.♍
या मंदिराला लागूनच उत्तराभिमुख विष्णूमंदिर आहे. हेच सूर्यनारायण मंदिर म्हणून ओळखले जाते. पर्वतमाथ्यावरील पावनकुंडाच्या काठी हरिहराची उभारणी करून शिव आणि विष्णू उपासकांचा सुयोग्य संगम येथे घडविण्यात आला आहे. सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला युद्ध खेळणार्या महिला सैनिकांचे शिल्प आहे. सामान्य क्षत्रिय स्त्रियांना घरचे कर्ते पुरूष बाहेर असताना स्वत:चे व गावचे संरक्षण करावे लागत असे. खेड्यातील स्त्री त्याकाळी युद्धात तरबेज होती. याचा हा सबळ पुरावा येथे पहावयास मिळतो. या मंदिरावर छोटे गोपूर असून, समोरील भागात अडीच फुटी नारायणाची सुंदर मूर्ती आहे.
या मंदिराच्या दक्षिण बाजूने 15 फूट अंतरावर छोटे ईश्वर मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे जणू उघडा गाभाराच. गाभार्यात ईश्वर वर्षभर ऊनपाऊसथंडीशी सामना करतात. तीर्थाच्या उत्तर काठावरदेखील साळुंकीवर दोन फूट शंकराची मूर्ती अशीच उन्हापावसात असते.
या मंदिराच्या सभोवताली विस्तृत पाषाण आहे. पाषाणावर काही ठिकाण रथचक्रे गेल्याचे दिसते. मंदिराच्या दक्षिण टेकडीवर दोन फूट रूंद आणि तीन फूट खोल असे खड्डे दिसतात. या खड्ड्यात उन्हाळ्यातदेखील पाणी असते. त्यात निळीपांढरी कमळफुले उगवतात. हे या टेकडीचे आगळे वैशिष्ट्य मानावे लागेल. रथचक्रांचा मार्ग छोटे खड्डे यावरून या टेकडीवर रामाने रावणाशी सीतामाईसाठी युद्ध केले, अशी एक आख्यायिका आहे. याच टेकडीवर वीस बाय पंधरा फूट आकाराचा आणि तीनचार फूट उंचीवर असलेला एक विशाल पाषाण आहे. तो आजही अधांतरी आहे. सभामंडपाप्रमाणे याची रचना आहे. म्हणून याला सभामंडप म्हणून ओळखतात.
मंदिराच्या टेकडीवरून सभोवताली नजर टाकल्यास 30 ते 40 कि. मी. अंतरावरील भूप्रदेश दृष्टीपथात येतो.♍ सभोवताली ठिकठिकाणी दिसणारी हिरवळ तीव्र उन्हाचे चटके कमी करतात. हा संपूर्ण परिसर नयन मनोहर असल्याने देशविदेशातील पर्यटक येथे गर्दी करतात.या दोन मंदिरांप्रमाणेच हलशी व परिसरात अनेक मंदिरे पहायला मिळतात. काही मूर्ती व मंदिरे जमिनीत गाडली गेली असल्याचे सबळ पुरावे इतिहासकारांना मिळाले आहेत. गेल्या दहा वर्षात चार मंदिरांची डागडुजी करताना अनेक दुर्मिळ मूर्ती हलशी येथे सापडल्या आहेत. नृसिंह मंदिर परिसरात नागमूर्ती, हनुमान मूर्ती, आदीनारायण मूर्ती अशा अनेक मूर्ती आढळल्या आहेत. तर मागील वर्षी सुवर्णेश्वर मंदिराचे काम सुरू असताना मंदिराच्या डाव्या पायरीत पाच फूट उंचीची रेखीव सुबक शिवपार्वतीची मूर्ती सापडली आहे.♍ हलशी येथे सापडलेली ही दुर्मिळ मूर्ती म्हणून तिचा नावलौकीक झाल्याने आजही ही मूर्ती पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक येथे येत आहेत. लक्ष्मीनृसिंह राईस मिलच्या पाठीमागील बाजूस कदंब राजाचा राजवाडा होता. शिवाय राजवाड्यानजिकच स्मशानभूमी असल्याने येथे अनेक पुरावे मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात धारवाड विद्यापीठाने गावात दोन ठिकाणी उत्खनन केले आहे. त्याठिकाणी टेहळणी बुरूज, राजवाड्याचे अवशेष सापडले आहेत. गावात उत्खनन केल्यास अनेक मंदिरे व दुर्मिळ मूर्ती मिळू शकतात, असे सांगण्यात येते.♍

हलशी-बेळगाव ‘पर्यटनस्थळ’ दर्जा...तरीही दुर्लक्षित

बुधवार, मे १६, २०१८

मतांचा घोडेबाजार थांबविण्यासाठी नगरसेवकांना पाठविले सहलीला

मतांचा घोडेबाजार थांबविण्यासाठी नगरसेवकांना पाठविले सहलीला

नागपूर/ललित लांजेवार:
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक येत्या २१ मे रोजी होणार आहे.त्यामुळे सध्या या तीन जिल्ह्यात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे,अश्यातच आपल्या नगरसेवकाची व पक्षाच्या मतदारांची पळवापळवी होऊ नये व घोडेबाजार होण्याच्या भीतीने पक्ष्याच्या दबावामुळे भाजपच्या तब्बल २५ हून अधिक नगरसेवकांना त्यांच्या परिवारासोबत थंड हवेच्या ठिकाणी पाठवन्यात आल्याची माहीती सूत्रांकडून देण्यात येत आहे. यात जि.प. सदस्य,नगरससेवक,यांचा असल्याचे समजते.चंद्रपुर येथील 2 खाजगी ट्रॅव्हल्सने हे संपूर्ण नगरसेवक सहलीला निघाले आहे.ही सहल मंगळवारी निघणार होती मात्र काही कारणास्तव उशीर झाला व ते बुधवारी दुपारी निघाले.
येत्या २१ मे रोजी हि चुरशीची लढत होणार आहे,या मतदार संघात भाजपकडून रामदास आंबटकर, काँग्रेसकडून इंद्रकुमार सराफ,सौरभ तिमांडे (अपक्ष), जगदीश टावरी (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहे.मतदानाचे दिवस जवळ येत असतांना बघत या निवळनुकीला आता ज्वर चढू लागला आहे. सध्या ही जागा भाजपच्याच ताब्यात असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या रविवारी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या तिन्ही जिल्ह्यांतील नगरसेवक, जि. प. सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत आमदारही उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सर्वच नगरसेवक, जि.प. सदस्यांना कुठल्याही स्थितीत ही निवडणूक जिंकणे आवश्‍यक असून निष्ठेने कामाला लागण्याचा सल्ला दिला.या निवडणुकीत विजयासाठी मतदारांचे आवश्‍यक संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र, या तिन्ही जिल्ह्यांतील भाजपच्या ताब्यातील नगरपालिका, महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक विकासकामे थेट सार्वजनिक बांधकाम खात्याकडून होत असल्याने नगरसेवकांत नाराजीचा सूर आहे.त्यामुळे अनेक नगरसेवक हे नाराज आहेत, पक्षश्रेष्ठींनी निष्ठेने लढत जिंकून आण्यासाठी आदेश दिल्याने यात बहुतांश नगरसेवकांचे चेहरे लटकलेले असल्याची चर्चा आहे.
                                  ----------------------------------------------------------------------
जाहिरात...

भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo