Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शिबीर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिबीर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जुलै २१, २०१८

चंद्रपूर येथे पशुधनावर आधारीत प्रशिक्षणाचे आयोजन

चंद्रपूर येथे पशुधनावर आधारीत प्रशिक्षणाचे आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारासाठी शेळीपालन व गायीच्या दुग्ध व्यवसाय आधारीत प्रशिक्षणाचे आयोजन चंद्रपूर येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण दोन आठवडे कालावधीचे असून पशुधनावर आधारीत शेळी पालन व गाय पालन तसेच औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय आणि शेडची रचना, व्यवसायाचे फायदे इत्यादी माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणामध्ये पशुधनावर आधारीत विविध विषयांची माहिती विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाव्दारे देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी किमान 7 वी पास व 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक, युवतीना प्रवेश देण्यात येणार आहे. त्या युवकांकडे शाळा सोडल्याचा दाखला, मार्क शीट, राशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे.
त्यामुळे जे उमेदवार हे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असेल त्यांनी 24 जुलै 2018 पर्यत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उद्योग भवन, बस स्टॉप समोर चंद्रपूर येथे संपर्क साधवा, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

शुक्रवार, जून २९, २०१८

सावंगी मेघे रुग्णालयाचा उपक्रम;रविवारी भद्रावती येथे महाआरोग्य शिबीर

सावंगी मेघे रुग्णालयाचा उपक्रम;रविवारी भद्रावती येथे महाआरोग्य शिबीर

आरोग्य शिबीर सावंगी मेघे साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने भद्रावती येथे रविवार,दि. 1 रोजी मोफत आरोग्य तपासणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.भद्रावती येथील राजनंदन मंगल कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत
आयोजित या शिबिरात सावंगी मेघे रुग्णालयाच्या मेडिसिन, शल्यक्रिया, मुखशल्यचिकित्सा,अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनरोग, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, नेत्ररोग आणि कान, नाक व घसारोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णतपासणी करणार आहेत. या शिबिरात ईसीजी सुविधाही उपलब्ध राहणार आहे. या शिबिरातून सावंगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती होणार्या  रुग्णांना नोंदणी, रुग्णभरती, रुग्णखाट, सामान्य तपासण्या, भोजन आदी सुविधा विनामूल्य प्राप्त होतील. 
तर, अतिविशेष चाचण्या, बाहेरील औषधी, इम्प्लांट, दुर्बिणव्दारे तसेच विशेष शस्त्रक्रिया या सेवा माफक शुल्कात उपलब्ध होतील. या शिबिराव्दारे महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच फाटलेले ओठ व दुभंगलेला टाळूची मोफत शस्त्रक्रिया करनाऱ्या योजनेचाही लाभही घेता येईल. त्यासाठी रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड आपल्या सोबत आणणे, आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांनी या आरोग्यसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, यांनी केले आहे.

शुक्रवार, जून १५, २०१८

 सुशिक्षित बेरोजगारांना पशुसंवर्धनाचे प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगारांना पशुसंवर्धनाचे प्रशिक्षण

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारासाठी पशुसंवर्धनावर आधारीत प्रशिक्षणाचे आयोजन 28 जून ते 12 जुलै 2018 या कालावधीत महाराष्ट्र  उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर तर्फे करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण 15 दिवसाचे असून  पशुधन व्यवसाय क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून त्या प्रशिक्षणामध्ये  पशुसंवर्धनावर आधारीत विविध विषयांची माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी किमान 10 वी पास व 18 ते 45 वर्ष वयोगटातील  सुशिक्षित बेरोजगार असावा. त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला मार्क शीट, राशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे जे उमेदवार हे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी 27 जून 2018 पर्यत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, बस स्टॉप समोर चंद्रपूर येथे संपर्क साधवा, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
चार दिवसीय निशुल्क शिबीर 

शेती तसेच शेतीपूरक व्यवसायात आवड असणाऱ्या शेतकरी व बेरोजगारांसाठी स्व.प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून चंद्रपूर व जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी तसेच बेरोजगारांसाठी  सुवर्ण संधी चालून आली आहे.स्व.प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे नेते व चंद्रपुर विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी निशुल्क ४ दिवसीय पशु संगोपन आणि संवर्धन प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात करण्यात आले,चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट येथून जवळच असलेल्या वेंडली गावातील संजय सिंघम यांचे फार्म हाऊसवर या संपूर्ण चार दिवस चालणाऱ्या पशु संगोपन आणि संवर्धन प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर १८,१९,२०,२१, जून २०१८ चार दिवस चालणार असून  यात शास्त्रोक्त शेलीपालन व्यवसाय प्रशिक्षण,कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण,मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण,दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागपूर येथील पशुवैद्यकीय जाणकारांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांना लाभणार आहे.


मंगळवार, मे २९, २०१८

 1 जून ला बिबी येथे भव्य रक्तदान शिबीर

1 जून ला बिबी येथे भव्य रक्तदान शिबीर

लोकसेवक अँप'चे लोकार्पन:समाजसेवक
 डाँ.गिरीधर काळे मित्रमंडळाचे आयोजन
 आवाळपूर /प्रतिनिधी:
                 प्रसिद्ध समाजसेवक डाँ.गिरीधरभाऊ काळे यांच्या वाढदिवसानिमीत्य 1 जून ला बिबी येथे सकाळी 11 वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डाँ.गिरीधर काळे यांच्या माहीतीपटाचे 'लोकसेवक' मोबाईल अँप चे लोकार्पन होणार आहे. 
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार प्रमोद काकडे राहतील. उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक चे उपव्यवस्थापक कर्नल दीपक डे, विकास प्रकल्प अधिकारी संजय पेटकर, ठाणेदार महेश कोंडावार, रक्तदूत मंगेश पाचभाई, अभिनय किनेकर, हाकिम हुसेन, पं.स सदस्य सविता काळे उपस्थित राहतील.
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मागील 30 वर्षापासून अस्थिरुग्नावर निशुल्क सेवा करत आहे. चार लाखाहून अधिक रुग्नावर उपचार करुन त्यांनी रुग्नांना बरे केले असून ग्रामसभेने त्यांना 'डाँक्टर' ही उपाधी दिली आहे. यावेळी सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल विशेष कार्यपुर्ती सन्मानाने युवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.  रक्तदान शिबीराला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून   रक्तदान करावे असे आवाहन गिरीधर काळे मित्रमंडळाने केले आहे.


-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo