Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रक्तदान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रक्तदान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, सप्टेंबर २८, २०१८

चिमुकल्यानी दिला रक्तदानाचा संदेश ;तांडा वस्तीत २० युवकांनी केले रक्तदान

चिमुकल्यानी दिला रक्तदानाचा संदेश ;तांडा वस्तीत २० युवकांनी केले रक्तदान

आवाळपूर/प्रतिनिधी:
रक्तादानामुळेे अनेकांना जीवनदान मिळाले, हे सर्वाना कळत असेल तरी यासाठी मोजकेच लोक समोर येेेत असतात स्वत: रक्तदान करुन इतरांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करणारे बोटावर मोजन्या इतके आहेेेत. 
त्यात धंतोली तांडा येथील चिमूल्य विद्यार्थ्यांनी भर टाकत रॅली काढून रक्तदानाचा संदेश गावभर दिला.
रक्तदान ही आज काळाची गरज बनली आहे. रोज कुणाला ना कुणाला रक्त हवे असते तरी देखील नागरिक रक्तदान करण्यास दिरंगाई किंवा टाळाटाळ करतात. त्यामुळे रक्ताची अत्यंत गरज भासत आहेत. हे गावातील युवकाचा लक्षात येताच त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले मात्र रक्तदानाचा संदेश युवका पर्यन्त कोणत्या माध्यमातून पोहोचवायचा. ही गोस्ट शिक्षकाला कळताच त्यांनी "रक्तदान हेच जीवनदान" घोषवाक्य देत विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती करण्यत आली. तसेच रक्तदानाचे महत्व सुद्धा त्यांनी पटवून दिले.
यावेळी संत सेवालाल मंडळा मार्फत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा हाकेला साथ देत गावतील तरूण मंडळी धावून आली व तांडा सारख्या वस्ती मध्ये पहिल्यांदाच 20 युवकांनी रक्तदान केले.. 
सदर कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रल्हाद पवार,ओम पवार,सरपंच विजयजी रणदिवे नारायण राठोड, सुपडा वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, मंडळातील सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत रक्तदान शिबिरास परिश्रम घेतले तसेच रक्तपेढी चंद्रपूर यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.

बुधवार, सप्टेंबर १९, २०१८

अष्टविनायक गणेश मंडळात रक्तदान शिबिर

अष्टविनायक गणेश मंडळात रक्तदान शिबिर


अष्टविनायक गणेश मंडळ तर्फे दिनांक 18/09/2018 ला। रक्तदान शिबिर घेण्यात आले दरवर्षी प्रमाणे सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारे मंडळ म्हणून परिचित आहे तसेच अन्य कार्यक्रमामध्ये 
1)रांगोळी स्पर्धा 
2)स्वछता सफाई 
3)मुली शिकवा मुली घडवा 
4) चित्रकला स्पर्धा लहान मुलांसाठी 
5)भजन संध्या 
6) भव्य महाप्रसाद 
असे विविध कार्यक्रम राबवित आहे .
रक्तदान शिबीर ला तसेच मंडळाला अप्पर पोलीस आयुक्त हेमराज सिह राजपूत जिल्हा चंद्रपुर यांनी मंडळाला भेट दिली त्यांना पुष्प गुच्छ व गणेश मूर्ती भेट देऊन स्वागत करण्यात आले तसेच रक्तदात्यांचे अभिनंनदन केले सामाजिक उपक्रम राबविणे हा खुप छान संदेश जनतेस पोहचवण्यास अग्रेसर मंडळ आहे रक्तदान शिबिरास प्रमुख उपसुस्थिती रक्तदूत रक्तदान महादान फाऊंडेशन चे अध्यक्ष मंगेश भाऊ पाचभाई हे होते मंडळातर्फे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला 22रक्तदात्यांनी रक्तदान करून बाप्पा कडून पावती घेतली त्याच बरोबर जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय गडचांदूर वैद्यकीय अधिक्षय यांना उपजिल्हा रुग्णालयाची मागणी व रक्त पेठी संच ची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली या।मध्ये अष्टविनायक गणेहं मंडळ, 
रक्तदान महादान फाऊंडेशन,व प्रहार संघटना गडचांदूर यांच्या वतीने मागणी करण्यात आली.
सोबत मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सतिश बिडकर,निखिल एकरे ,वैभव गोरे,सदू गिरी,मेघराज एकरे,संजय ढेपे,शरद जोगी, गणेशमामा,चेतन,पंकज,सागर,प्रजवल,रितेश,कुलदीप,निखिल , गोपाल,उपस्थित होते

रविवार, जून ०३, २०१८

रक्तदानाने डाँ.गिरीधर काळेंच्या सेवेला युवकांचा सलाम

रक्तदानाने डाँ.गिरीधर काळेंच्या सेवेला युवकांचा सलाम

लोकसेवक अँप'चे लोकार्पन;विशेष कार्यपुर्ती निमीत्य तरुणांचा सत्कार
गडचांदूर/प्रतिनिधी:
कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डाँ.गिरीधरभाऊ काळे यांच्या वाढदिवसानिमीत्य 1 जून ला बिबी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. परिसरातील 78 युवकांनी रक्तदान करुन समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांच्या लोकसेवेला सलाम केला. यावेळी 'लोकसेवक' मोबाईल अँप चे लोकार्पन व परिसरातील युवकांचा विशेष कार्यपुर्तीनिमीत्य सत्कार करण्यात आला.
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, विकास प्रकल्प अधिकारी संजय पेटकर,रक्तदूत मंगेश पाचभाई, अभिनय किनेकर, हाकिम हुसेन, पं.स सदस्य सविता काळे, उपसरपंच आशिष देरकर, मनोज भोजेकर, डाँ.पवार, उपस्थित होते.
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मागील 32 वर्षापासून मानवी शरिरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्नांवर निशुल्क सेवा करत आहे. चार लाखाहून अधिक रुग्नांवर त्यांनी उपचार करुन रुग्नांना बरे केले आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले काळे यांच्या वैद्यकिय सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ग्रामसभेने त्यांना 'डाँक्टर' ही उपाधी दिली आहे. रोज शेकडो अस्थिरुग्नावर निशुल्क उपचार करणारे समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांच्या सेवेला युवकांनी रक्तदान करुन सलाम केला.
यावेळी सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल दीपक चटप, सुकेश ठाकरे, उमेश पिदूरकर, सुनिल नन्नावरे, सतिश जमदाडे, नितेश मालेकर, प्रफुल्ल क्षिरसागर, विनोद गुरनुले, राहूल मोरे या युवकांचा विशेष कार्यपुर्तीनिमीत्य सत्कार करण्यात आला. समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असून गरिब रुग्नांसाठी ते देवदूत आहे. त्यांच्या निस्वार्थ लोकसेवेची दखल शासनाने घेणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पोईनकर यांनी तर संचालन दीपक चटप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजसेवक डाँ. गिरीधर काळे मित्रमंडळाचे सतिश पाचभाई, रत्नाकर चटप, पुरुषोत्तम निब्रड,चंदू झुरमुरे, हबीब शेख, सुरज लेडांगे, मंगेश माहूरे, किशोर विधाते, गणपत तुम्हाणे, संतोष बोभाटे, नितीन शेंडे, संदिप पिंगे, महेश नाकाडे, अनिल घुगूल, हिराचंद्र कुमरे, सचिन आसुटकर यांनी परिश्रम घेतले. 
'लोकसेवक' मोबाईल अँप देईल 'ब्लड डोनर'
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांच्या सामाजिक कार्याच्या माहीतीचा प्रसार व प्रचारासाठी 'लोकसेवक' नावाने मोबाईल अँप बनवण्यात आले. गडचांदूरातील साँफ्टवेअर अभियंता सुकेश ठाकरे यांनी हे मोबाईल अँप तयार केले असून गुगल प्ले स्टोअर वर ते उपलब्ध आहे. पाहूण्यांच्या हस्ते या अँप चे लोकार्पन करण्यात आले. या अँपमध्ये डाँ.गिरीधर काळे यांच्या माहीतीसह 'ब्लड डोनर' यांची ही माहीती उपलब्ध असल्याने यातून रुग्नांना रक्तपुरवठा होण्यास मदत होईल. हे अँप 'ब्लड डोनर'मुळे सामाजिक वरदान ठरणार आहे.
                                          -------------------------------------------------------   
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


मंगळवार, मे २९, २०१८

 1 जून ला बिबी येथे भव्य रक्तदान शिबीर

1 जून ला बिबी येथे भव्य रक्तदान शिबीर

लोकसेवक अँप'चे लोकार्पन:समाजसेवक
 डाँ.गिरीधर काळे मित्रमंडळाचे आयोजन
 आवाळपूर /प्रतिनिधी:
                 प्रसिद्ध समाजसेवक डाँ.गिरीधरभाऊ काळे यांच्या वाढदिवसानिमीत्य 1 जून ला बिबी येथे सकाळी 11 वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डाँ.गिरीधर काळे यांच्या माहीतीपटाचे 'लोकसेवक' मोबाईल अँप चे लोकार्पन होणार आहे. 
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार प्रमोद काकडे राहतील. उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक चे उपव्यवस्थापक कर्नल दीपक डे, विकास प्रकल्प अधिकारी संजय पेटकर, ठाणेदार महेश कोंडावार, रक्तदूत मंगेश पाचभाई, अभिनय किनेकर, हाकिम हुसेन, पं.स सदस्य सविता काळे उपस्थित राहतील.
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मागील 30 वर्षापासून अस्थिरुग्नावर निशुल्क सेवा करत आहे. चार लाखाहून अधिक रुग्नावर उपचार करुन त्यांनी रुग्नांना बरे केले असून ग्रामसभेने त्यांना 'डाँक्टर' ही उपाधी दिली आहे. यावेळी सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल विशेष कार्यपुर्ती सन्मानाने युवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.  रक्तदान शिबीराला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून   रक्तदान करावे असे आवाहन गिरीधर काळे मित्रमंडळाने केले आहे.


-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


सोमवार, मे १४, २०१८

रक्तदान शिबीर संपन्न

रक्तदान शिबीर संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने चंद्रपूर येथील युथ ऑफ चांदा फाऊंडेशन व रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशन तर्फे मातृदिनाचे औचित्य साधून तुकुम येथील शहीद भगतसिंग चौक ( एस.टी.वर्कशॉप) येथे रविवारी रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते ,या शिबिरात ६० रक्तदात्यांनी आपले सामाजिक दायित्व समजून रक्तदान केले.जिल्ह्यात सर्वत्र रक्ताची कमतरता भासत असल्याचे पाहून गरजू रुग्णाला वेळेवर रक्ताचा पुरवठा करता व्हावा,या उद्देशाने युथ ऑफ चांदा फाऊंडेशन व रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात रक्तदात्यांना केळ,जूस,ड्रायफ्रूट व या सारख्या वस्तू देण्यात आल्या होत्या,या कार्यक्रमाला उपस्थित युथ ऑफ चांदा फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश बेलखेडे सर व रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष हकीम हुसेन भाई यांच्या सोबत दोन्ही फाऊंडेशनच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला होत. समीर शेख,किरन निमरड व शुभम दलाल,सचिन उमरे,अमित वझारकर,मेहुल पटेल,नितीन पेंदाम,रमीज शेख,विशेष गिरी,महेश म्याकलवार,दिक्षांत बेले,मयूर मदनकर,प्रकाश नागरकर ,विलास सोमलवार,तेजस झाडे,निलेश पाझरे,वेदांत अलमस्त,आधार मिश्रा
फैजान शेख,शिवम कपूर,चैतन्य खडतड,अभिजीत भाऊ,मदन चिवंडे,राहूलआवळे,विवेक धोटे यांनी या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यास मोलाचे सहकार्य केले.
                            -----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

-------------------------------------------------------------------------
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 


कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo