Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

खच्याक मामा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खच्याक मामा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, फेब्रुवारी २७, २०२१

या बाबुरावाना व्हायचे होते डॉक्टर पण झाला "खच्याक मामा"

या बाबुरावाना व्हायचे होते डॉक्टर पण झाला "खच्याक मामा"

‼️ "इव्हरी बडी से खच्याक" ‼️


📢  या बाबुरावाना व्हायचे होते डॉक्टर पण झाला "खच्याक मामा"

------------------------------------------------
माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
------------------------------------------------
दि २७ फेब्रुवारी
आज शनिवार रोजी "खच्याक मामा" गेल्याची बातमी आली आणि खच्याक मामा बद्दल लिहायचे होते ते राहुन गेल्याचे लक्षात आले.कोल्हापुरात खच्याक मामा माहिती नाही अशी एकही व्यक्ती नाही.सोशल मिडीयावर तर खच्याक मामाने धुम वाजवली.प्रत्येकाच्या मोबाईल वर खच्याक मामाचे व्हिडिओ आहेत.कोणी त्याला खुळा म्हणतो,कोणी क्रॅक म्हणतो तर कोणी काय काय म्हणतो,काही जण तर,जास्त शिकुन हा बाबुराव वेडा झाला.असे सुध्दा म्हणत.



त्याची कहाणी एेकल्यावर मन हळहळल्याशिवाय राहत नाही.करवीर तालुक्यातील निगवे येथे आई-वडिलांसह बाबू आणि त्यांचे चार बंधू राहत होते. आई-वडील आणि मोठी भावंडे दुसर्‍याच्या शेतावर राबत. मिळेल ते काम करुन पोटाची खळगी भरत. इयत्ता चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेत बाबू राज्यात पहिला आला.घरची परिस्थिती नसल्याने शिक्षकांनी बाबूला सातार्‍यातील शासकीय शाळेत घातले. तेथून चांगल्या मार्कांनी दहावी झाल्यानंतर बाबूने गोखले कॉलेजमधून बारावी सायन्स केले. आता आपले लहानपणापासूनचे एमबीबीएसचे स्वप्न पूर्ण होणार या खुषीत बाबू होता. मात्र प्रत्येकवेळी शिक्षणाचा खर्च आडवा येत गेला. डॉक्टर होऊ न शकल्याने मनाने खचलेला बाबू बी.एस्सी झाला. जोडीला त्याने गायनाची आवड जपली.दरम्यान बारावीपर्यंत विद्यार्थ्यांचे होम ट्युशन घेऊ लागला.मग उदरनिर्वाह करण्यासाठी दरवाज्यावर जाऊन काही काही वस्तू विकण्याचे काम स्वीकारले.पण चंचल मन कुठेच रमले नाही.शेवटी काही मित्रांच्या संगतीने मानसिक स्थिती खालावली आणि तो चक्क व्यसनाधीन बनला...पण बाबुराव दमला नाही बरं का ...मिळेल ते काम करत राहिला..नशिबानं साथ दिली आणि बाबुरावचा विवाह झाला..त्याची पत्नी कोल्हापूर मधील एका खाजगी दवाखान्यात नर्स आहे...या घडीला बाबुरावच्या दोन मुली बीएस्सी चे शिक्षण घेत आहेत आणि मुलगा दहावी च्या वर्गात शिकतोय...त्याच्या घरचे लोक खूप चांगले आहेत.मात्र बाबूचे पुन्हा मानसिक संतुलन गेले.
कधी कोल्हापूरात तर कधी कसबा बावडा करीत तो कायम बावडा येथेच राहु लागला.बावड्यातील गल्‍लोगल्‍ली सुरेल आवाजात मोठ्याने गाणी म्हणत फिरत कोणी काय दिले किंवा नाही दिले तरी कायम खुशीत असणारा खच्याक मामा कोरोना काळात कोरोनावर अस्खल इंग्रजीत  भाषण देत पाहतापाहता सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. गाणी किंवा भाषणाच्या शेवटी "इव्हरी बडी से खच्याक" म्हणणारा बाबू खच्याक मामा नावानेच प्रसिध्द झाला. बाबूचे कोरोनावरील इंग्रजीतील भाषण सध्या युट्यूबवर गाजत आहे. रस्त्यातून जाताना एखादा पाण्याचा नळ सुरू दिसला तरी घरातील कोणालातरी बोलावून, अहो.. ताई पाणी वाया घालवू नका, असा शहाणपणाचा सल्‍ला देणारा मामा मानसिक रोगी तरी कसा म्हणायचा.
मास्क वापरा, स्टे अ‍ॅट होम असे वारंवार सांगणारा मामा काही आौरच.मोहम्मद रफी,किशोर कुमार, आणि मुकेश ची हिंदी गाणी गात फिरतो आणि कोणी काही रक्कम बक्षीस दिली तर त्यावर समाधान मानतो...यादरम्यान जर तरुण मुले भेटली की बाबुराव त्यांना खूप चांगले उपदेश सुद्धा देतो..टिक टॉक, फेसबुक आणि व्हॉटस्अप च्या या जमान्यात बाबुराव तरुण मुलांच्या गळ्यात ताईत बनून फिरतो,तरुणांनी त्याला खच्याक मामा म्हणून फेमस करून टाकलंय... एकदा काय झाले,तरुणाच्या एका टोळक्यापुढे बाबू गाण म्हणत होता. त्यातील एकाला बाबूने विचारले काय करतोस? तो म्हटला सी.ए. सेकंडला आहे. बाबू म्हटला, तुला न सुटलेला स्टॅटस् चा प्रॉब्लेम मला सांग. मला सुटेना याला काय सुटणार? असे म्हणत त्या तरुणाने काहीशा चेष्टेनेच त्याला वहीपेन दिला. बाबूने तब्बल दोन प्रकारे प्रॉब्लेम सोडवून दाखविला. बाबूची बुध्दीमत्ता पाहून सारेच आवाक् झाले.अशा या मामाची अचानक एक्झिट मनाला चटका लावुन गेली.लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणारे मामा यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.मामाला भावपूर्ण श्रध्दांजली.

अनिल पाटील पेठवडगाव
9890875498

💤  ‼️  💤  ‼️  💤  ‼️  💤  ‼️  💤