Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कृषी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कृषी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, जानेवारी १५, २०१८

चंद्रपुरात कृषी मेळावा व विभागीय जलसाक्षरता केंद्राचे भव्य आयोजन

चंद्रपुरात कृषी मेळावा व विभागीय जलसाक्षरता केंद्राचे भव्य आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:   
चंद्रपूर जिल्हयातील कृषि आधारीत अर्थव्यवस्थेला व एकूण शेती व्यवस्थेला जलव्यवस्थापन, कृषि व्यवस्थापन व बदलत्या परिस्थितीत शेतीमधील बदल स्विकारण्याबाबतचे विचार मंथन आज पासून चंद्रपूरच्या चांदा क्लबवर सुरु झाले आहे.राज्यातील वापरायोग्य पाण्याची उपलब्धता, वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग, अनियमित पर्जन्यमान यामुळे पाण्याच्या वापरावरील ताण वाढणार आहे, यासाठी जलजागृती आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्याला जलसाक्षर करण्यासाठी नियोजन करण्याची आखणी केली होती. नागपूर महसूल विभागात चंद्रपूरची विभागीय जलसाक्षरता केंद्रासाठी निवड करण्यात आली. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जलसाक्षरता कार्यशाळेचे व विभागीय जलसाक्षरता केंद्राचा शुभारंभ करण्यात आले.
                           याचवेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, महिला स्वंयस्वायत्ता समुहामार्फत कृषि प्रदर्शनी व वस्तु विक्री प्रदर्शनीलाही प्रारंभ झाला. 15 ते 19 जानेवारी या काळामध्ये ही प्रदर्शनी चालणार असून या ठिकाणी कृषि तंत्रज्ज्ञानातील नवनवीन अविष्कार बघायला मिळणार आहे. शेतीशी नाळ जुळली असणा-या प्रत्येक विद्यार्थ्याने, गृहीनीने व शेतक-यांने या चार दिवसांच्या कार्यक्रमात चांदा क्लब मैदानाला भेट दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये जिल्हयातील एकूण शंभर महिला बचत गट सहभागी होत आहे. 
                   या प्रदर्शनीमध्ये सहभागी गटांच्या माध्यमातून बाजाराच्या मागणीनुसार विविध गृहोपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचे, धने, शेवया, चटनी, रेडीमेड कपडे, खादीचे कपडे, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांब पोळी, पुरण पोळी, झुनका भाकर, मोहाची भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तू, टेबल क्लॉथ, मेंढीच्या केसापासून बनलेल्या गादया, उशा, घोंगडी, लाकडी शिल्प, टोपल्या, सुप-परडे, खराटा, झाडू, कंदील, शोपीस, हातसळीचे तांदुळ, सुहासीक तांदुळ, कापडी बॅग, मशरुम, टेराकोटा, गांडूळ खत, गोमुत्र अर्क, आयुर्वेदिक उत्पादने, तुरदाळ, उडीद, चणा, मुग, मटकी, चवळी इत्यादी ग्रामीण भागातील कडधान्ये विक्रीला उपलब्ध होणार आहेत.

सोमवार, नोव्हेंबर २७, २०१७

दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच

दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच

चंद्रपूर/ मूर्तिजापूर- - शेतकऱ्यांच्या शेतमालाला बऱ्यापैकी भाव नाही. त्यामुळं कापसाच्या बाजारपेठेत कापूस विकण्यासाठी शेतकरी जात नाही.  अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच भरून ठेवला आहे.
 विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकऱ्यांचे कापूस हे नगदी पीक आहे. चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे खासगी व्यापारी कापसाची खरेदी करीत आहे. शासनाने कापसाला दिलेला हमीभाव, त्यापेक्षा अतिशय अल्प आहे. कापसाला भावच नसल्याने अतिशय अल्प दरात कापूस कसा विकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना चांगलाच सतावत आहे.

 मूर्तिजापूर तालुक्यातील कपाशीचे नुकसान! 
मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक  बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच  शिवाय पांढर्‍या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे. 

शनिवार, नोव्हेंबर ११, २०१७

 दादाजी खोब्रागडे यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली

दादाजी खोब्रागडे यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली

#एचएमटी चे जनक/ भात वाण संशोधक दादाजी खोब्रागडे (वय ७९) यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना सकाळी ९ वाजता नांदेड गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. #चंद्रपूर #नागभीड कृषी

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

‘कृषी व कृषी कल्‍याण योजनांवर’ कार्यशाळा

‘कृषी व कृषी कल्‍याण योजनांवर’ कार्यशाळा

  • महाराष्‍ट्र व गोवा राज्‍यातील क्षेत्रीय प्रचार अधिकारी व कर्मचा-यांचा कार्यशाळेत सहभाग


नागपूर, - केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असणा-या क्षेत्रीय प्रचार संचालनलयाच्‍या पुणे विभागीय कार्यालयातर्फे नागपूरातील स्‍थानिक हॉटेल तुली इंपेरियल येथे ‘कृषी व कृषी कल्‍याण योजनावर’ आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्‍यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटक म्‍हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्‍था, नागपूरचे संचालक डॉ. वी. एन. वाघमारे तर अध्‍यक्ष म्‍हणून केंद्रीय लिंबू बर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यावेळी उपस्थित होते. क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्‍या पुणे व रायपूर विभागाच्या अतिरिक्‍त महासंचालिका श्रीमती मोनीदीपा मुखर्जी, जैविक शेती केंद्र, नागपूर क्षेत्रीय संचालक डॉ. ए.एस. राजपूत, आदर्श ग्राम योजनेचे पुणे येथील तांत्रिक अधिकारी श्री. रविकांत गौतमी व पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचे विस्‍तार अधिकारी श्री. नवलाखे यावेळी उद्घाटकीय सत्रास प्रामुख्‍याने उपस्थित होते.

यवतमाळ व इतर जिल्‍हयात कापूस पीकावर कीटकनाशकाच्‍या फवारणीमूळे शेतक-यांच्‍या मृत्‍यूबद्दल केंद्रीय कापूस संशोधन संस्‍था नागपूरचे डॉ. वाघमारे यांनी किटकनाशकांचा अमर्यादित वापर कारणीभूत असल्‍याचे सांगितले. बोंडअळी.(बोल-वर्म) व रस शोषक अ‍ळी (व्‍हाईट-फ्लाय)चा प्रादुर्भाव पीकांवर एका ‘थ्रेश-होल्‍ड’ पातळीच्‍या पुढे गेल्‍यानंतरच पीकांवर कीटकनाशाची फवारणी करावी लागते, पंरतु, शेतकरी कीडीचा प्रादुर्भाव पडण्‍या ]अगोदरच पंपाच्‍या साहाय्याने फवारणी करतात. यामुळे बोंड अळी, रस शोषणारी अळीचा नाश होतो परंतु सोबतच या अळयांना रोखणा-या ‘मैत्री अळींचाही’ नाश होतो. यामुळे शेतक-यांनी फवारणी करण्‍याअगोदर पीकावरील कीडीची थ्रेश-होल्‍ड पातळीची पाहणी करणे आवश्‍यक आहे, असे डॉ. वाघमारे यांनी या कार्यशाळेत सुचविले. केंद्रीय कापूस संशोधन, नागपूरतर्फे संशोधन, प्रात्‍यक्षिके व विस्‍तार कार्यक्रम देशाच्‍या विविध भागांमध्‍ये राबवले जातात. कृषी विषयक योजना शेतक-यांपर्यंत पोहोचण्‍यासाठी माहिती प्रसारण मंत्रालयाअंतर्गत क्षेत्रीय प्रचारकांची भूमिका या अनुषंगाने महत्‍वाची आहे याकडे

डॉ. वाघमारे यांनी लक्ष वेधले.

शेतक-यांमध्‍ये साक्षरतेचे प्रमाण जास्त नसल्‍याने संशोधन संस्‍था व कृषी विदयापीठातर्फे केलेले संशोधन कार्य त्‍यांना समजेल अशा सुलभ भाषेत सांगणे महत्‍वाचे आहे. याकरिता क्षेत्रीय प्रचार संचालनलयाच्‍या क्षेत्रीय कार्यालयातर्फे जन-जागृतीचे केले जाणारे कार्य कौतुकास्‍पद बाब असल्‍याचे केंद्रीय लिंबु-वर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. लदानिया यांनी स्‍पष्‍ट केले या संशोधन केंद्रातर्फे 100 पेक्षा जास्‍त प्रात्‍यक्षिके शेतांमध्‍ये केली गेली असून या केंद्रातर्फे

शेतक-यांना लिंबुर्गीय पीकांच्‍या लागवडी संदर्भात प्रशिक्षणही दिले जाते, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली.

क्षेत्रीय प्रचार संचालनालय, रायपूर व पुणेच्‍या अतिरिक्‍त महासंचालिका श्रीमती मोनीदीपा मुखर्जी यांनी क्षेत्रीय प्रचार संचालनालय प्रथमच कृषी मंत्रालयाकरिता विशेष प्रचार अभियानाचा भाग म्‍हणून या कार्यशाळेचे आयोजन करत असल्‍याचे सांगितले. कृषी-विषयक योजनांचा प्रचार व प्रसार करण्‍यासोबतच प्रत्‍यक्ष–फिल्‍ड वर जाऊन त्‍यांना या योजने संदर्भात शेतक-यांना अवगत करणे, क्षेत्रीय प्रचारकांची जबाबदारी आहे. कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव घेणे आवश्‍यक असून मोबाईलव्‍दारे शेतक-यांना ‘ई-नाम’या ऑनलाईन बाजारपेठ सेवेचा लाभ घेता येणे शक्‍य आहे, यामूळे कृषी क्षेत्रातील विपणन श्रुंखलेतील दलालीला आळा बसेल, अशी अपेक्षा श्रीमती मुखर्जी यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

नागपूर येथील गौंडखेरी स्थित जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजपूत यांनी जैविक पद्धतीने कीड नियंत्रण केल्‍यास शेतक-यांना कीटनाशकाचा वापर करण्‍याची गरज भासणार नाही, असे सांगितले. या कार्यशाळेत तांत्रिक सत्रामध्‍ये केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमि उपयोग नियोजन संस्‍था, नागपूर व कृषी विभाग नागपूर येथील अधिका-यांतर्फे कापूस माहिती तंत्रज्ञान व प्रसार, राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान, मृदा सर्वेक्षणाचे कृषी मध्‍ये महत्‍व, पंतप्रधान पीक विमा योजना, सिंचन योजना या विषयांवर व्‍याख्‍यान देण्‍यात आली. उद्घाटकीय सत्राचे सूत्रसंचालन नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. मनोज सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. पराग मांडळे यांनी केले.या कार्यशाळेला अहमदनगरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. माधव जायभाये, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्‍हाण, तसेच महाराष्‍ट्र व गोवा राज्‍यातील क्षेत्रीय प्रचार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बुधवार, नोव्हेंबर ०८, २०१७

10 पासून अॅग्रोव्हिजन-2017’ कृषी प्रदर्शन

10 पासून अॅग्रोव्हिजन-2017’ कृषी प्रदर्शन

 उद्‌घाटनास भारताचे उपराष्ट्रपती श्री.एम. वैंकेया नायडू राहणार प्रमुख अतिथी

  पशुधन दालन असणार प्रदर्शनाचे खास आकर्षण 

 

नागपूर -
मध्‍यभारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्‍या ‘अॅग्रोव्हिजन – 2017:राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा व परिसंवादाचे’ उद्घाटन नागपूरमध्ये 10 नोव्‍हेंबर 2017 रोजी भारताचे उपराष्‍ट्रपती श्री.एम. वैंकेया नायडू यांच्‍या  प्रमुख उपस्थितीत दुपारी 4 वाजता होणार आहे. स्‍थानिक रेशीबाग मैदान येथे 10 नोव्‍हेंबर ते 13 नोव्‍हेंबर 2017 दरम्‍यान अॅग्रोव्हिजन संस्‍थान, एम.एम.एक्टिव्‍ह , विदर्भ इॅकॉनॉमिक डेव्‍हलपमेंट काउसींल  (वेद) , पूर्ति उद्योग समूह व महाराष्‍ट्र  उद्यमशिलता विकास महामंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाच्‍या उद्घाटकीय सत्रामध्‍ये उद्घाटक म्हणून महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्‍ते महामार्ग व जहाजबांधणी मंत्री व केंद्रीय जलसंपदा,नदी विकास व गंगा पुनर्रोत्थान मंत्री श्री.नितीन गडकरी  उपस्थित राहतील. केंद्रीय गृहराज्‍यमंत्री श्री. हंसराज अहीर , महाराष्‍ट्राचे कृषी मंत्री श्री. पाडुरंग फुंडकर , अर्थ व नियोजन मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार, नागपूरचे पालकमंत्री व राज्‍यांचे उर्जा मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

    केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरींच्‍या संकल्‍पनेतून साकारलेले अॅग्रोव्हिजनचे हे 9 वे वर्ष असून यासंदर्भात माहिती देण्‍यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन आज करण्‍यात आले होते. यावेळी अॅग्रोव्हिजनचे आयोजन सचिव श्री. रवि बोरकर , श्री. रमेश मानकर,  संयोजक श्री. गिरीश गांधी, सल्‍लागार समितीचे अध्‍यक्ष डॉ. सी.डी.मायी उपस्थित होते. यावर्षी अॅग्रोव्हिजनमध्‍ये 450 पेक्षा जास्‍त स्‍टॉल्‍सचा समावेश राहणार आहे.यामध्‍ये गाय, शेळया, मेंढया यांच्‍या विविध वाणाचे प्रदर्शन असणारे एक पशुधन दालन (लाईव्‍ह स्‍टॉक पॅव्‍हलियन) हे या कृषी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण राहणार आहे,असे प्रदर्शनाची माहिती देतांना श्री. रवि बोरकर यांनी  सांगितले.

Ø  विविध कार्यशाळांचे आयोजन

दिनांक 11 नोव्‍हेंबर रोजी कृषीविषयक कार्यशाळांचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता केंद्रीय रस्‍ते महामार्ग व जहाजबांधणी मंत्री व केंद्रीय जलसंपदा,नदी विकास व गंगा पुनर्रोत्थान मंत्री श्री.नितीन गडकरी ,  केंद्रीय  सुक्ष्‍म, लघु व मध्‍यम उद्योग राज्‍य मंत्री श्री.गिरीराज सिंह  यांच्या प्रमुख उपस्थितीत   होईल. याप्रसंगी राज्याचे पशु संवर्धन मंत्री श्री. महादेव जानकर व सहकार मंत्री श्री. सुभाष देशमुख उपस्थित राहतील.11 नोव्‍हेंबर 2017 रोजी ‘बांबू उत्‍पादन व संधी’ यावर तज्‍ज्ञांचे चर्चासत्र स्‍थानिक सुरेश भट सभागृहात होणार आहे. ‘विदर्भ दुग्‍ध विकास परिषद’ दिनांक 12 नोव्‍हेंबर 2017 रोजी होणार असून यामध्‍ये नॅशनल डेयरी डेवलपमेंट बोडचे अध्‍यक्ष डॉ. दिलीप रथ मार्गदर्शन करणार आहेत. 13 तारखेला दुपारी 2.00 वाजता सुरेश भट सभागृहात ‘गरजेहून जादा उत्‍पादनाचे व्‍यवस्‍थापन’ (सरप्‍लस मॅनेजमेंट) या चर्चासत्रात विचारमंथन करण्‍यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता होणा-या समारोपीय कार्यक्रमास केंद्रीय रस्‍ते महामार्ग व जहाजबांधणी  मंत्री श्री. नितीन गडकरी ,केंद्रीय आयुष्‍य राज्‍यमंत्री (स्‍वतंत्र प्रभार) श्री. श्रीपाद येसो नाईक प्रामुख्‍याने उपस्थित राहणार आहेत. या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी छत्‍तीसगड , हरीयाणा व मध्‍यप्रदेशचे कृषी मंत्रीही उपस्थित राहतील.  

या सर्व कार्यशाळा व परिषदेत भाग घेण्‍यासाठी ‘अॅग्रोव्हिजन मोबाईल अॅप’वर सुविधा उपलब्‍ध आहे, या कृषी प्रदर्शनामध्‍ये भारतीय कृषी परिषद (आय.सी.ए.आर.), केंद्रीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सी.एस.आय.आर.) , कृषीविज्ञान केंद्र, यांसारख्या संस्थाचे तसेच कृषीयंत्र, पाणी-व्‍यवस्‍थापन, बँका,विमा कंपन्या, बीयाणे, खते यांचे स्‍टॉल्‍स असणार आहेत. बचतगटातर्फे ‘फूड कोर्टही’ या प्रदर्शनात असेल.या कृषी प्रदर्शनास 4 ते 5 लक्ष शेतकरी भेट देतील.  कृषी प्रदर्शनात आयोजित कार्यशाळेच्‍या माध्‍यमातून यशस्‍वी कास्तकार व    शेतक-यांना त्यांचे अनुभव मांडण्‍यासाठी व्‍यासपीठ उपलब्‍ध होणार आहे. याचा लाभ सर्व राज्‍यातील शेतक-यांनी घ्‍यावा, असे आवाहन अॅग्राव्हिजन सल्‍लागार समितीचे अध्‍यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी पत्रकार परिषदेत केले.