Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

इंग्रजीची भिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इंग्रजीची भिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जुलै १४, २०२०

🔹इंग्रजीची भिती🔹

🔹इंग्रजीची भिती🔹



⭕   इंग्रजीची भीती वाटते? ह्या ५ सोप्या युक्ती वापरा आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा  ⭕



____________________________
   *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_* 
*╰──────•◈•──────╯* 
____________________________
.        🌀 *_दि.  १४ जूलै २०२०_* 🌀
❗तुमच्यासमोर अनेक लोक असे असतील जे मराठी माध्यमांतून शिकले पण अस्खलित इंग्रजी बोलतात.
त्यांनी देखील वरील ५ युक्त्याच वापरल्या आहेत ह्याची खात्री बाळगा…आणि आत्मविश्वासाने कामाला लागा…!
  .   *_१. मराठीचा अभिमान असावा पण म्हणून इंग्रजीचा द्वेष करू नये_*
   कोणतीही नवीन भाषा शिकल्याने आपल्याला फायदाच होणार आहे हे लक्षात ठेवा आणि इंग्रजी शिकल्यामुळे तुमच्यातला मराठीपणा कुठेही लोप पावणार नाही हे ही समजून घ्या.   
*_🌹..............................................._*
╔══╗ 
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _ 
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
*_२. इंग्रजी वर्तमानपत्र आठवड्यातून तीनदा तरी वाचा_*
आणि त्यातल्या किमान पाच नव्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. त्यातील वाक्यरचना समजून घ्या. शब्दसंग्रह जितका वाढवाल, वाक्यांची बांधणी जसजशी समजून घ्याल, तसतसा तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट 
*_३. इंग्रजी सिनेमे, मालिका नियमित पहाण्याचा प्रयत्न करा_*
सुरुवातीला उपशीर्षकां (subtitles) सहित पहावे. (तरीही पहिले ५ सिनेमे कळणार नाहीत!) पण निराश न होता प्रयत्न चालू ठेवावेत १० सिनेमांनंतर तुम्हाला subtitles शिवाय सिनेमे समजू लागतील. या मुळे नवीन इंग्रजी शब्द आणि त्याचे उच्चार तुमच्या कानी पडतील आणि इंग्रजीतून विचार करण्याची प्रक्रिया आपोआप सुरु होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे लिखित इंग्रजी भाषा “बोलली” कशी जाते हे कळून येईल. इंग्रजी लिखाण-वाचनावरील प्रभुत्व ही पहिली पायरी आहे. तिचं “बोली भाषेत” स्वरूप कसं आहे हे इंग्रजी चित्रपट, टीव्ही सिरीजमधून उत्तम कळतं.
*_❗४. रोज अर्धातास तरी बोलणे_*
मित्र, मैत्रीण, आई बाबा किंवा आरसा यांच्या पैकी कोणा एका सोबतका होईना रोज अर्धातास बोला. ( काही सुचत नसेल तर पाहिलेल्या इंग्रजी सिनेमातले डायलॉग म्हणा, किंवा स्वतःबद्दल बोला, म्हणजे तुमचं नाव, शाळा वगैरे) – मग तुमच्या चुका तुम्हालाच लक्षात येतील आणि या चुका पुढे होणार नाहीत याची काळजी घ्या.ही पायरी अत्यंत महत्वाची आहे. बोलण्याचा सराव स्वतः केल्याशिवाय तुमचं स्पोकन इंग्लिश सुधारणार नाही.
*_❗📖५. पुस्तक_*
फक्त वर्तमानपत्र वाचून शब्दसंग्रह वाढवणं कठीण आहे. इंग्रजी साहित्याला शिवल्याशिवाय त्या भाषेवर विजय मिळवणे कठीण आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा का होईना एक पुस्तक जरूर वाचावं. सुरुवातच करायची असेल तर सुधा मूर्तींच्या पुस्तकांपासून करा , इंग्रजी किती सोपं आहे हे ती पुस्तकं सांगतात…!
आणि शेवटी, यादीत नसलेली परंतु सर्वात महत्वाची गोष्ट –
तुम्ही मराठी माध्यमातून शिकलाय ही समस्या नसून एक संधी आहे हे नीट समजून घ्या.
तुम्ही तुमची मातृभाषा पूर्णपणे आत्मसात केली असल्याने तुम्ही तिचा तर आस्वाद लुटताच (तुम्हाला पु.ल. कळतात…!). आता तुम्हाला नवीन भाषा शिकण्याची संधी देखील मिळत आहे हे ध्यानात ठेवा. हे ही लक्षात ठेवा की इंग्रजी ही “आपली” भाषा नसल्यामुळे तिचा वापर करताना आपल्याकडून चूक होण्याची शक्यता आहेच, फक्त चुकांची पुनरावृत्ती होणार नाही एवढं पहा.
इनमराठी वरून साभार 
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
_*माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव*_ 
*╰──────•◈•──────╯*