Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

आचरा : येथे सापडला तरंगणारा दगड  लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आचरा : येथे सापडला तरंगणारा दगड  लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑगस्ट १०, २०२०

आचरा : येथे सापडला तरंगणारा दगड

आचरा : येथे सापडला तरंगणारा दगड

⭕ आचरा : येथे सापडला तरंगणारा दगड ⭕
---------------------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव --------------------------------------
⭕ श्रीलंकेत रामसेतु बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला,त्या प्रकारातील दगड ⭕
------------------------------------
दि. १० आॅगष्ट २०२०
मालवण तालुक्यातील आचरा गावच्या समुद्र किनाऱयावर चक्क पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड सापडला आहे. किनाऱयावर सकाळी फिरण्यासाठी गेलेले स्थानिक मच्छीमार नारायण कुबल यांना पाण्यात तरंगणारा हा दगड सापडला आहे. किनाऱयालगतच्या पाण्यात हा दगड तरंगत किनाऱयावर येताना कुबल यांना आढळला. कुतूहलाने सापडलेला दगड कुबल यांनी आपल्या घरी आणला.
सापडलेला दगड हा सुमारे 5 किलो वजनाचा आणि 1 फूट लांबीचा असा चौरस आकाराचा आहे. समुद्र किनारी फिरताना सापडलेल्या दगडाला माती, शेवाळ लागलेला होता. सापडलेला दगड कुबल यांनी स्वच्छ करून पुन्हा पाण्यात टाकला असता दगड पाण्यावर तरंगू लागला. या दगडाचे वजन अंदाजित 5 किलोपर्यंत असले तरी हा दगड पाण्यात टाकला की एखादे प्लास्टिक किंवा थर्माकोल जसे हलके असते तसे त्याचे वजन होते व तो पाण्याच्या प्रवाहात वाहू लागतो.एखादे प्लास्टिक किंवा थर्माकोलप्रमाणे तो पाण्याच्या प्रवाहात तरंगत वाहू लागतो.
या दगडाबाबत कुबल यांनी इंटरनेटवर सर्च केले असता, श्रीलंकेत रामसेतु बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला, तो दगड याच प्रकारातला असल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारचे दगड दक्षिण भारतासोबतच श्रीलंका आणि जपान या भागातही आढळत असल्याचे त्यांना नेटच्या माध्यमातून समजले.
आचरा येथे सापडलेला दगड हा प्युमायस स्टोन (pumice stone) असून ज्यावेळी पाणी आणि लाव्हारस एकत्र येतात, तेव्हा असे दगड तयार होतात. त्याला प्युमायस स्टोन (pumice stone) असे म्हणतात. दगड तयार होताना त्यामध्ये हवा अडकलेली असते. ज्यावेळी तापमान वाढलेले असते, त्यावेळी दगडातील हवा प्रसरण पावते. त्याने हे दगड पाण्यात तरंगतात, अशी माहिती अभ्यासक नागेश दफ्तरदार यांनी दिली.