Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

मल व्यवस्थापन प्रक्रियेतुन होणार उत्त्तम खताची निर्मिति The process of manure management will produce better manure

नीरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ) आणि मनपाचा उपक्रम

 
चंद्रपूर १३ सप्टेंबर - चंद्रपूर शहर महानगरपालिका व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI ) नागपुर यांच्यात शौचालय मैला व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी करार करण्यात आला असुन याद्वारे शौचालय मलावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाणार आहे. 
   ७ सप्टेंबर रोजी आयुक्त राजेश मोहीते व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI ) चे संचालक डॉ.ए.एन. वैद्य यांच्याद्वारे करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.गिरीश पोफळी,शास्त्रज्ञ डॉ.अमित बंसीवाल,स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. अमोल शेळके उपस्थीत होते.
    चंद्रपूर महानगरपालिकेच्या पठाणपुरा येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत सदर प्लांट उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता २५ क्युबिक मीटर प्रतिदिवस राहणार आहे. सदर प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर खत निर्मिती करता येणे शक्य असल्याने मनपाच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पाला लागणार बहुतांश निधी हा नीरी संस्थेकडुन दिला जाणार असुन याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे मंजुरी प्राप्त झाली आहे. या प्रकल्पात केंद्र सरकार तसेच अनेक आंतरराष्ट्रीय संस्थाचे सुद्धा सहकार्य लाभणार आहे,या तंत्रज्ञानावर आधारीत अश्या स्वरूपाचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे.  

   भारत सरकार व युरोपियन युनियन यांच्याद्वारे संयुक्तरीत्या ' हॉरीझॉन २०२० ' हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भारतातील पाणी आणि सांडपाणी यावर देखरेख व प्रक्रिया करणे तसेच सुरक्षित पाण्याच्या पुनर्वापरासाठी शाश्वत अश्या नैसर्गिक आणि प्रगत तंत्रज्ञानाची उपयुक्तता आणि उपयोगिता सुनिश्चित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. पाणी प्रदूषण कमी व्हावे या दृष्टीने शौचालय मलावर प्रक्रिया व व्यवस्थापन करून तांत्रिकरीत्या सक्षम, कमी खर्चिक व पर्यावरणदृष्ट्या शाश्वत अशी उपाययोजना करण्याचा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI ) व चंद्रपूर महानगरपालिका यांचा प्रयत्न आहे.  



The process of manure management will produce better manure
National Environmental Engineering Research Institute

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.