Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर २१, २०२२

Madhya Pradesh Election: बारिश के मोसम मे चूनावी गर्मी

Story by Deonath Gandate 
भारताचे ह्रदयस्थान असलेल्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात सध्या दर दोन दिवसाआड पावसाच्या सरी सतत बरसत आहेत. इथे बारिश का मोसम असताना नगरपालिका परिषदेच्या निवडणुकीची गर्मी दिसून येत आहे. 






छिंदवाडा जिल्ह्यातील सहा नगरपरिषद निवडणुका होत असून जुन्नरदेव, हरई, सौसर, पांदुरणा, दमुआ, मोहगाव मध्ये निवडणूक होत आहे.पूर्वीच्या विदर्भ प्रांतातील अनेक तालुके मध्य प्रदेशात असल्याने मराठी भाषिकांची संख्या आहे. 

जिल्ह्यातील सहा नगरपालिका परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता जोरात सुरू होत आहे. उमेदवार आणि जिल्हास्तरावरील नेते निवडणूक प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. या आठवड्यामध्ये निवडणूक प्रचाराची धुमशान असणार आहे. काँग्रेसच्या वतीने खासदार नकुलनाथ आणि माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ निवडणूक प्रचाराची कमान सांभाळणार आहेत, तर दुसरीकडे भाजपकडून मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विडी शर्मा प्रचार मैदानात उतरणार आहेत. प्रभारी मंत्री कमल पटेल हे सुद्धा प्रचार दौऱ्यात सहभागी होतील.

Chhindwada जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपालिकांच्या सहा ठिकाणी निवडणुका असून, 27 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. 25 सप्टेंबर पर्यंत प्रचार यात्रा सुरू राहतील. सोळा सितंबर रोजी प्रचार यात्रेला सुरुवात झाली. प्रारंभीची तीन दिवस उमेदवार आणि स्थानिक नेते घरोघरी जाऊन प्रचार सुरू केलेला आहे. गुरुवार, ता. 22 पासून मोठ्या नेत्यांच्या प्रचार यात्रेला सुरुवात होईल. 22 रोजी शिवराजसिंग चौहान प्रचार यात्रेला संबोधित करणार आहेत.23 रोजी कमल नाथ यांचा दौरा होणार आहे. 

काँग्रेस - भाजपची तिकीट न मिळाल्याने अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने देखील एन्ट्री करून सामना रोमांचकारी बनवला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.