पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत आज रोजी सकाळी 10.30 वाजता दरम्यान मौजा कुजबा येथील 5 महिला कापुस वेचण्या करिता आम नदीच्या पलीकडील शेतमालक नामे परमानंद तिजारे रा. टाकली यांच्या शेतामध्ये त्यांच्याच डोंग्याने जात असता आम नदीच्या पात्रात अचानक डोंगा फुटल्याने डोंगयामध्ये पाणी भारत असता, डोंग मध्ये बसलेल्या महिला घाबरल्याने डोंगा पलटी झाले. त्यामध्ये नाव सौ गीता रामदास निंबारते ही मरण पावली व बाकीचे नामे मनू सुरेश साळवे , मनीषा राजू ठवकर, लक्षमी लोमेश्वर गिरी , मंगला देवराव भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे हे प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे उपचार घेत असून, त्यापैकी नामे लक्षमी लोमेश्वर गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांना प्राथमिक उपचार करून मेडिकल कॉलेज येथे रेफर करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात कुजबा येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव (डोंगा) उलटल्याने पाच महिला बुडाल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर चौघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.गीता रामदास मृतम हिला गीता निंबर्ते ( वय ३०) रा. कुजबा असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस ठाणे वेलतूर अंतर्गत येणाऱ्या मौजा कुजबा येथील ५ महिला कापूस वेचण्याकरिता आम नदीच्या पलीकडील शेतमालक परमानंद तिजारे (रा. टाकली) यांच्या शेतामध्ये त्यांच्याच डोंग्याने जात हेत्या. दरम्यान, आम नदीच्या पात्रात अचानक डोंगा फुटला व त्यात पाणी भरले. या प्रकाराने डोंग्यात बसलेल्या महिला घाबरल्या. तितक्यात काही कळायच्या आत डोंगा पलटी झाला.