शरदराव पवार महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य अभियानाअंतर्गत लसीकरण शिबिर
गडचांदूर:- शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तालुका आरोग्य विभाग कोरपणा यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी covid-19 लसीकरण शिबिर महाविद्यालयात आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. सविताताई टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, आरोग्य सभापती श्री राहुल उमरे, आरोग्य सेविका कांचन चंदनखेडे, आरोग्य सहाय्यक श्री टोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले. covid-19 प्रतिबंधात्मक उपक्रमाअंतर्गत लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.
सदर शिबिराला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शरद बेलोकर यांनी केले.
प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व तालुका आरोग्य विभाग कोरपणा यांचे सहकार्य लाभले. covid-19 नियमांचे पालन करुन शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
#yuth #health