विहामांडवा प्रतिनिधी
दि.३१ऑक्टोंबर रविवार रोजी कन्नड ऍग्रो बारामती चे विहामांडवा गटातील ऊस तोड झालेल्या उसाचे वाहन भरून कन्नड कडे रवाना करण्यात आले.या गटात जवळपास ४० ते ४५ टोळ्या चालू झाल्या असून मागील वर्षी पैठण तालुक्यातील १ लाख ५२ हजार टन ऊस या कारखाना ने नेला होता.
आता यावर्षी या पेक्षा जास्त ऊस नेण्यात येईल अशी ग्वाही या वेळी कारखान्याचे शेतकी अधिकारी पठाण साहेब यांनी दिली.
यावेळी सर्व वाहन मालक व ट्रॅक्टर ड्रायव्हर चा गावातर्फे जेष्ठ नागरिक ताहेर पटेल,सुरेश पा दुबाले, डॉ गुलदाद पठाण,डॉ सुरेश पा चौधरी,मोहम्मद हानिफ साहेब,मुश्ताक पठाण,डॉ जहांगीर पठाण,बबनराव गवंदे,भीमराव धनावडे, अहमद मुकादम,डॉ तौसिफ पठाण,रईस मौलाना,नसीर पठाण,गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष वाहेद पठाण सर,भीमराव दनावडे,मकसूद पठाण,प्रहलाद डोके,रहेमतूलला पठाण,हाजी इसहाक सेठ,शेरखा मास्टर, हरून पटेल,सलिम पठाण, हरून पठाण,डॉ अरशद पठाण,सिराज पठाण,बाबासाहेब भावले,,राजू शेख,असलंम शेख,जालु ढाकणे,हबीब पठाण, यांनी सर्व ड्राइवर व गाडी मालकांचा टोपी टॉवेल देवून सत्कार केला या वेळी कारखानेचे कानडे साहेब, अदमाणे साहेब,रहीमखा पठाण साहेब, व सर्व गाडी मालक उपस्थित होते.