कृत्रिम बेटामुळे पाण्याची पातळी घसरली. तलाव खोलीकरण याची नितांत गरज.
शिरीष उगे, भद्रावती/प्रतिनिधी
:-भद्रावती तालुक्यातील नागपूर चंद्रपूर राज्य महामार्गालगत घोडपेठ गावातील घोडपेठ नामक तलावा झेंडू नामक वनस्पती पसरल्याने भद्रावती येथील मच्छिंद्र मच्छीमार सहकारी संस्थेला गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे संस्था कमिटीच्या नियोजनाअभावी ही वनस्पती दिवसेंदिवस वाढत आहे. या संस्थेत सुमारे 500 हून अधिक मच्छीमार सभासद असून त्याच्या कुटुंबीयांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मालकीचा व पंचायत समिती कार्यक्षेत्रातील अंदाजे 80 एकर चा तलाव शेतीच्या सिंचना शिवाय हा तलाव मत्स्य संगोपन व मासेमारीसाठी मच्छीमार संस्थेला लीजवर प्राधान्याने देण्यात येतो महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या जिल्हा परिषदांची निर्मिती झाली त्यानंतर जिल्हा परिषदेची आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनासाठी जिल्ह्यातील 107 ऊन अधिक माजी मालगुजारी तलाव व मालगुजारांन कडून शासनाने आपल्या ताब्यात घेऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम तथा सिंचन विभागाकडे सोपविण्यात आले.
साने 19 51 मध्ये मच्छीमार व भोई समाजातील मच्छीमारांचे जीवनमान व आर्थिक स्तर कसा सुधारेल असा उदात्त हेतू ठेवून दिवंगत माजी खासदार जती रामजी बर्वे यांच्या प्रेरणेतून भोई व ढिवर समाजांच्या लोकांनी एकत्रित येऊन प्रथम अध्यक्ष स्वर्गीय सदाशिव कामतवार व संचालक कमिटी सदस्यांनी संस्थेची स्थापना केली.
हे तलाव चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाच्या शिफारसीनुसार जिल्हा परिषद कडून संस्थेच्या सभासदाच्या उपजीविकेच्या माध्यमातून मस्त संगोपन करून मासेमारीसाठी 5 वर्षाच्या करारावर लीजवर घेण्यात येते आहे. गेल्या सत्तर वर्षापासून ही तलावे संस्थेच्या ताब्यात आहे. पाचशेच्या वर सभासदांच्या कुटुंबांचा गाळा या तलावाच्या मासेमारीमुळे चालतो .
मासेमारी व्यतिरिक्त शिंगाळा शेतीच्या लागवडीसाठी अतिरक्त लिज देखील संस्थेला मोजावी लागत होती .मात्र कालांतराने सन 1999 =2000 या वर्षी तलावात झेंडू नामक वनस्पतीने शिरकाव केला ज्यामुळे शिंगाडा शेती करणे अशक्य झाले याचीच परिस्थिती संस्थेला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
तलावात दरवर्षी लाखो रुपयाचे लाखो मत्स्यबीज संगोपनासाठी सोडली जाते त्यातून लाखो चे मत्स्यो उत्पादन होत असते मात्र झेंडू सारखी नुकसानकारक वनस्पती पाण्यावर तरंगून संपूर्ण तलावावर पसरल्यामुळे जाळे टाकून मासे पकडणे कठीन झाले आहे. या वनस्पतीमुळे पुरेसा प्राणवायू मिळत नसल्याने मासे मृत्युमुखी पडत आहे. कार्यरत असलेल्या संचालक कमिटीने तसेच शासकीय प्रशासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
घोडपेठ तलावात झेंडू सारखी वनस्पती पसरल्याने सतत मासे मृत्यूमुखी पडल्याने तसेच शिंगाडाचे उत्पादन ठप्प झाल्याने संस्थेला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकारासाठी कार्यरत असलेली संचालक कमिटी जबाबदार असल्याचा आरोप माजी अध्यक्ष दिलीप मांढरे यांनी केला आहे.