Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी २९, २०२१

राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये @keshavupadhye

भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला

 


आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी  मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधीराजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राममंदिराच्या  निधीची उठाठेव  करू नये,  असा टोला  भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये  यांनी एका  पत्रकाद्वारे लगावला आहे.  

 काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राममंदिर निधी संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर शंका घेत हा निधी योग्य ठिकाणीच जाईल याची राज्य सरकारने काळजी घ्यावी असे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यासंदर्भात  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. उपाध्ये  यांनी म्हटले आहे की, राममंदिरासाठी सामान्य माणूसही  स्वतःहून  निधी देऊ लागल्याने काँग्रेसी मंडळींचा  पोटशूळ झाला आहे त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही याची चिंता काँग्रेसवाल्यांना  वाटू लागली आहे. राममंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होत आहे. निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरीत निधी देणाऱ्याकडे सुपूर्त करीत आहेत. निधी संकलन करणाऱ्या संघटनांवर विश्वास असल्यानेच  गोरगरिबही निधी संकलनास  हातभार लावत आहेत. 

ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराल्ड  गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर आहे अशा पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांना सगळीकडे गैरव्यवहारच  दिसत असणार.  राममंदिराचा  निधी  नॅशनल हेराल्ड प्रमाणे अन्यत्र  वळविला जाणार नाहीयाची सामान्य माणसाला खात्री आहेअसेही श्री. उपाध्ये  यांनी पत्रकात म्हटले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.