Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर २१, २०२१

साडी दिन कधी असतो?



साड्‍यांचे प्रकारसर्वांना दीपिका आणि शाहरुखचा 'चेन्‍नई एकस्‍प्रेस' चित्रपट माहिती असेल. पण 'चेन्नई सिल्क' नावाची साडी जगातील सर्वात महागडी साडी आहे. ही साडी हातमागावर बनवली जाते. विशेष म्‍हणजे या साडीच्‍या पदरावर राजा रविवर्मा यांचे चित्र आहे. हे चित्र हिर्‍या माणकांनी जडवलेले आहे. या साडीची किंमत ४० हजार इतकी आहे.

नवीन चित्रपट, नवी मालिका आली की बाजारात त्‍याच नावाची साडी येते. त्‍यामुळे नेमके साड्‍यांचे प्रकार किती आहेत याची माहिती देणे कठीण आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध प्रांताचे विविध पोषाख आहेत. अशाच काही भारातातील विविध प्रांतातील सांड्‍याचे प्रकार.

कांजीवरम साडीकांजीवरम साडी म्‍हटले की समोर येतो तो बॉलिवूड अभिनेत्री रेखाचा पोषाख. रेखा आणि कांजीवरम साडी जणु एक समीकरणच बनले आहे. रेखाला साडीत पाहून प्रत्‍येक स्‍त्रीला साडी नेसण्‍याचा मोह आवरत नाही. हेच तर कांजीवरम साडीचे वैशिष्ट्य आहे. तामिळनाडूमधील कांचीपुरम येथे घराघरात सिल्क साड्या विणल्या जातात. गर्भरेशमी काठ व मऊ मुलायम पोत हे या साड्यांचे वैशिष्ट्य. कांजीवरम साड्यांमध्ये प्रकार खूप पाहयला मिळतात. अरूंद काठाची , टेंपल बॉर्डर किंवा रेखा नेसते तशी मोठ्ठ्या काठाची टेंपल बॉर्डर असे प्रकार या साडीत पाहायला मिळता. बॉलिवूड अभिनेत्री दीपिकगा पदुकोणने देखील तिच्‍या लग्‍नात कांजीवरम साडी नेसली होती.


पैठणीप्रत्‍येक स्‍त्रिला तिच्‍याजवळ एक तरी 'पैठणी' असावी असे मनापासून वाटते. पैठणी हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. पूर्वी पदरावर पोपट आणि मोर एवढीच कलाकुसर पाहायला मिळत होती. आता पदरावरच नाहीतर काठावरही पानाफुलांची नक्षी पाहायला मिळते. दीवाळी, पाढवा या सणाला स्‍त्रिया आवर्जून 'पैठणी' नेसतात. पैठणी आणि नाकाता नथ यामुळे स्रिच्‍या सौंदर्यांत भरच पडते.

इरकली साडीइल्कल साडीला काही ठिकाणी इरकली साडीही म्हटले जाते. ही साडी मूळची ’इल्केकल्लू’ नावाच्या विजापूरजवळच्या गावाती आहे. एकदम तलम-मऊ मुलायम, करड्या रंगाची, थोडीशी चमक असलेली गर्भरेशमी साडी कर्नाटकातील असली तरी महाराष्ट्रात तितकीच लोकप्रिय आहे. पूर्वी घराघरात आज्यांकडे अशा साड्या होत्‍या. आता मात्र तीच फॅशन म्‍हणून परत नेसली जाते. इल्कल सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात मिळते. पूर्ण हातमागावर विणलेल्या साडीची किंमत अधिक असते पण यंत्रमागावर विणलेल्या साड्याही बाजारात मिळतात. विशेष करुन संक्रातीच्‍या सणाला काळ्‍या रंगाच्‍या इरकल साडीची स्रिया खरेदी करतात.


बनारसी साडीबनारसी पान ज्‍याप्रमाणे प्रसिद्ध आहे त्‍याचप्रमाणे बनारसी साडीही प्रसिद्ध आहे. बनारसी साडीला महाराष्ट्रात वेगळेच महत्व आहे. लग्‍नामध्‍ये शालू घ्‍यायचा झाल्‍यास बनारसी सिल्कला स्‍त्रिया प्राधान्‍य देतात. यातही बरेच प्रकार आहेत. मृदू मुलायम पोत आणि वेलबुट्टी ही या साडीची खासियत आहे.
बालुचेरी साडीपदरावरती पौराणिक कथांचे चित्रण असलेली ही साडी बंगाल आणि बांग्लादेशातही प्रामुख्याने नेसली जाते. ही साडी दोन रंगातही मिळते.

काश्मिरी साडी 
काश्मिरी शॉल सर्वांच्‍या परिचयाच्‍या आहेच. पण काश्‍मिरी साडीही बाजारात पाहायला मिळते. या साडीवर बारीक कलाकुसर केलेले असते. ती या साडीची खासियत आहे. बऱ्याचदा ही कशिदाकारी प्युअर जॉर्जेटसारख्या मटेरिअलवर केलेली असते. भरतकाम केलेल्या साड्यांचेही पुष्कळ प्रकार आहेत.


माहेश्वरी साडीमाहेश्वरी साडी हा कॉटन आणि रेशमी धागे एकत्र विणलेला एकदम तलम प्रकार आहे. मध्य प्रदेशातल्या माहेश्वर गावच्या या साड्या वजनाला एकदम हलक्या आणि वापरायला एकदम सुटसुटीत असतात. काही दिवसापुर्वी आलेल्‍या 'बाहुबली' या चित्रपटात अशाच पद्धतीच्‍या साड्‍या वापरल्‍या होत्‍या. त्‍यानंतर काही दिवसात ही साडी 'बाहुबली' साडी या नावाने बाजारात आली होती.
सध्‍या बाजारात 'लागीरं झालं जी' या मराठीत मालिकेत मुख्‍य भूमिकेत असलेल्‍या शीतलच्‍या साड्‍यांची स्रियांच्‍यात क्रेझ आहे. शेवटी काय, साडी हा प्रत्‍येक स्रीचा जिव्‍हाळ्‍याचा प्रांत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.