३० वर्ष एकटयाने खपुन गावासाठी कालवा खोदुन पाणी आणले
--------------------------------------माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव--------------------------------------बिहार मधील कोथिलावा एक छोटसं खेडेगाव.गावाला शेती भरपुर पण पाणी नाही. म्हणुन प्रत्येकजण पोटासाठी शहराकडे पळत असलेला.ही गोष्ट तीस वर्षापुर्वी लौंगी भुईयान यांनी हेरली होती.त्यावेळीं त्यांचे वय ३५-३७ च्या दरम्यान होते.त्यांनी त्यावेळी कालवा खोदायला घेतला.हाती फक्त कुदऌ व फावडे एवढेच साहित्य होते.कोणी या गोष्टींना पांठीबा दिला तर कोणी त्यांना वेडयात काढले.आज तीस वर्षानंतर त्यांची मेहनत फळास आली.त्यासाठी तब्बल तीस वर्षे एकट्याने राबून तीन किलोमीटर पर्यंतचा कालवा खोदण्याची अशक्यप्राय कामगिरी पार पाडली. आता परिसरातील डोंगरावरून पावसाचे पाणी वाहून न जाता त्यांच्या गावात येणार आहे.
कोथिलावा हे गाव गया शहरापासून ८० किलोमीटरवर दाट जंगलात वसलेले असून डोंगररांगांनी वेढलेले आहे. शेती आणि पशुपालन हेच येथील ग्रामस्थांचा उदरनिर्वाहाचे साधन आहे. पावसाळ्यामध्ये डोंगरांवरून वाहत येणारे पाणी नदीला जाऊन मिळायचे, यामुळे भुईयान अस्वस्थ झाले होते. हे पाणी वाचायला हवे आणि त्याचा गावासाठी वापर व्हायला हवा, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे कालवा खोदण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी एक-दोन नव्हे; तर तब्बल तीस वर्षे एकट्याने त्यांनी खोदकाम केले. आता त्यांच्या गावात पाणी आले असून यामुळे गावात मोठ्या संख्येने असलेल्या गुरांना आणि शेतीला पाणी मिळणार आहे.
लौंगी भुइंया यांची मुलंही कामधंदा शोधण्यासाठी घराबाहेर पडली होती. गावाजवळच्या बंगेठा डोंगरावर बकऱ्यांना चरायला घेऊन गेलेलं असताना भुइंया यांच्या मनात एक विचार आला. गावात पाणी आलं तर तरुण मुलांचं उदरनिर्वाहासाठी शहरात जाणं कमी होईल. पीकं घेता येतील.
पाऊस पडतो तेव्हा बंगेठा डोंगराच्या कुशीत साठवलं जातं. त्यातूनच त्यांना आशेचा किरण दिसला.
साठलेलं पाणी शेतापर्यंत कसं नेता येईल याचा नकाशा त्यांनी तयार केला. डोंगर फोडून कालवा बनवण्याच्या कामाला ते लागले.
एक दोन वर्ष नव्हे, पाच नव्हे, दहा नव्हे तर तब्बल तीस वर्ष हे काम चाललं. तीस वर्षांच्या अथक परिश्रमानंतर डोंगरातलं पाणी त्यांनी गावातल्या तलावात आणलं. एकट्याने फावडं चालवत त्यांनी तीन किलोमीटर लांबीचा कालवा खणला. 5 फूट रुंद आणि 3 फूट खोल कालवा त्यांनी खोदला.
यंदा ऑगस्ट महिन्यात भुइंया यांचं काम पूर्ण झालं. पावसाळ्यात त्यांच्या मेहनतीला अर्थ प्राप्त झाला आहे. आजूबाजूच्या तीन गावांना भुइंया यांच्या मेहनतीचा फायदा होत आहे. लोकांनी यावेळी गहू-तांदळची पेरणी केली आहे.
लौंगी यांना चार मुलं आहेत. यापैकी तीन गावाबाहेर असतात. घरी बायको, एक मुलगा, सून आणि त्यांची मुलं असं कुटुंब आहे.डोंगरातलं पाणी शेतात आलं याचा आनंद भुइंया यांच्यासह गावकऱ्यांना आहे. मात्र अनेकदा मदत मागूनही प्रशासनाने काहीही केलं नसल्याचा रागही आहे. लौंगी सांगतात, "इतक्या वर्षात कोणी आलं नाही. आता माणसं येतात आणि आश्वासनं देऊन जातात. मला आता काही नको. माझ्या घरात आणखी एक शौचालय असावं अशी माझी इच्छा आहे. माझं घर मातीचं आहे. ते ढासळतं आहे. मी डोंगर फोडायचं काम केलं नसतं तर आतापर्यंत पक्कं घर बांधलं असतं. मला कोणतंही पदक, पुरस्कार नको. मला ट्रॅक्टर हवा आहे जेणेकरून मी शेती करू शकेन".
बिहार भागातच नव्हे तर देशात त्यांचे कौतुक होत आहे.