मुंबई/ प्रतिनिधी
रिपरिवर्तन फाउंडेशन आणि रिलायंस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भांडुपमधील गोरगरीब व गरजू अशा ५०० नागरिकांना राशन किट वाटप करण्यात आले. निस्वार्थ भावनेने काम केलं की आपल्यासाठी मदतीचे हजारो हात उभे राहतात. त्याच उक्तीप्रमाणे रामकली शाळेचे चेअरमन श्री. पप्पी शेठ यांनी त्यांच्या शाळेच्या संकुलातील जागा संस्थेला विनामूल्य उपलब्ध करून दिली.
भांडुप विधानसभा आमदार श्री. रमेशभाई कोरगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे जनता दल सेक्युलर ईशान्य मुंबई अध्यक्ष श्री. संजीवकुमारजी सदानंदन यांनी सुद्धा कार्यक्रमास भेट देऊन उपस्थित सभासदांचे मनोबल वाढविले. शिवसेना शाखा क्रमांक ११४ चे शाखाप्रमुख श्री. राजेश कदम आणि जनता दल चे प्रवीणजी कॅस्ट्रो यांचे नियोजन आणि व्यवस्थापनासाठी उत्तम सहकार्य लाभले. भारतीय जनता पक्षाचे भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीणजी दहितुले यांनी देखील गर्दीचे नियोजन करण्यासाठी सहकार्य केले. प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली बोन्स, उपाध्यक्ष सुशीलकुमार सावळे, सेक्रेटरी रेणू श्रीमांकर, रामकाली शाळेच्या प्रिन्सिपल कुसुम बिश्त, डॉ. आनंदी सिंग, कमलाकर सावळे तसेच नितीन अंभोरे, विशाल खवळे, निलेश अहिरे, अभिषेक साखरे, प्रवीण काकडे, निलेश ढेकळे, संदेश गायकवाड, योगेश ढेकळे, राकेश खोपकर, कुणाल शिंदे, बाळा खरात, सचिन अहिरे, दीपक पाटील, अनिकेत सकपाळ, दानिश शाह, दीपक कांबळे, सिद्धांत माने अन्य सर्व सभासदाचे उत्तम सहकार्य लाभले. तसेच महिलामंडळाच्या वतीने ज्योती सावळे, संध्या इंगळे , सखुबाई सुरवाडे, रेश्मा सरोज, उर्मिला जैस्वाल यांचे कौतुकास्पद सहकार्य लाभले.
रिपरिवर्तन फाउंडेशन गेल्या कित्येक वर्षांपासून समाजसेवेचा वसा जपत आरोग्यसेवा, शिक्षण, आदिवासी विकास, अनाथ मुले, फुटपाथवर राहणारे लोक, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, हातमजूर, महिला अत्याचार, सामाजिक सलोखा अशा अनेक क्षेत्रात गेल्या पाच वर्षांपासून अविरत कार्य करत आहे.
ङाॅ. आनंदी सिंह यानी *"सोशल स्पार्क" - मास्क मदद् मुफ्त* तरफे 200 मास्क गरजु लोकाना मुफ्त वाटप केले. असे गेल्या चार महिने पासून सोशल स्पार्क ची टीम यानी स्वता मास्क बनवून हजारों लोकांना व काही संस्थांना वाटप केले.