*गणेशाच्या आगमन व विसर्जनसाठी दोन दिवस नेमून द्या - आ किशोर जोरगेवार यांच्या सूचना*
*शांतता समितीची बैठक संपन्न*
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत साधे पणाने गणेश उत्सव पार पडावा कोणतीही गर्दी होणार नाही यासाठी गणेशाचे आगमन व विसर्जना करिता दोन दिवस नेमून देण्यात यावे अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर, महापौर राखी कंचरलावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह इतर अधिकार्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आ. जोरगेवार यांनी गणेश मंडळांनी गणेश उत्सव साधा पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन केले. गर्दी होणार नाही याची काळजी सर्व गणेश मंडळांनी घ्यावी, असेही जोरगेवार म्हणाले, घरगुती गणपतीने विसर्जन योग्य रित्या करता यावे याकरिता मनपा प्रशासनाणे उपयोजना करण्याचाही सूचना यावेळी त्यांनी केल्यात. तात्पुरता मीटर जोळणीसाठी मंडळांना अधिकचे पैसे भरावे लागू नये याचेही नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्यात.दरवर्षी अतिशय शांततेत गणेश उत्सव पार पडतो. यंदा कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे गणेश उत्सवाच्या भव्यतेत विघ्न आले आहे. मात्र आस्था भव्यस राहिली पाहिजे. यंदा गणेश भक्तांची जबाबदारी अधिक आहे. आणि ती ते उत्तम रित्या पार पडतील अशी आशा ही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.