Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ३०, २०२०

गरीबांना धान्याचा तुटवडा कमी पडू देणार नाही सरपंच ज्योत्सना नितनवरे

दवलामेटी येथे गरीब व गरजु लोकांंना मोफत किराणा व धान्य वाटप 
नागपूर : अरूण कराळे 
संपूर्ण देशात कोरोना प्रादुर्भावाने हाहाकार माजला आहे. सरकारने सर्वत्र संचारबंदी लागु केल्यामुळे गोर-गरीबांना आपल्या दोन टाईपच्या जेवनाचे वांदे झाले आहे . हातावर काम करणाऱ्या मजुराकडे धान्याचा साठा संपला असून त्यांना ग्रामपंचायत तर्फे धान्य वाटप करण्यात आले .

गावात असलेल्या कवेलारी जिल्हा शिवनी( मध्यप्रदेश ) येथील मजूरांना तेल, तांदूळ ,गहू ,दाळ तसेच  संपूर्ण किराणा देण्यात आला . त्यामुळे अत्यंत गरीब व म्हातारे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता . यापुढे सुध्दा गरीबांना धान्याचा तुटवडा कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन लाव्हा ग्रामपंचायतच्या सरपंच ज्योत्सना सुजित नितनवरे यांनी केले.

 दवलामेटी ग्रामपंचायत तर्फे रविवार ३० मार्च रोजी गरीब व गरजु लोकांंना मोफत किराणा व  धान्याचे वाटप केले . त्यावेळी त्या बोलत होत्या .यावेळी  नागपूर पं. स.चे माजी उपसभापती  सुजीत  नितनवरे ,ग्रा. पं. सदस्य  पांडुरंग  बोरकर , सुनील वानखेडे ,ऋषि धोंगडे ,रामकृष्ण धुर्वे , शेषराव लोणारे उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.