Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी ०६, २०२०

खुल्या बाटलीत पेट्रोल विकणाऱ्या पेट्रोलपंप मालकांवर कारवाई करा

महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मागणी
चंद्रपूर 


 - हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिकेला नांदोरी चौकात पेट्रोल टाकून जाळून मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या नराधमाला कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पेट्रोल राज्यात कुठेही पेट्रोल खुल्या बाटलीत विकणाऱ्या पेट्रोलपंप मालकावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली. आज तसे निवेदन आमदार धानोरकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले. 

हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिका महाविद्यालयात जात असताना निकेश नागराळे या नराधमाने पेट्रोल टाकून भररस्त्यावर पेटवून दिले. यात ती तरुणी गंभीर जळाली असून आज ती मृत्यूशी झुंज देत आहे. 

आरोपीने हि घटना नियोजनबद्ध पद्धतीने केली आहे. थंड डोक्याने जाणीवपूर्वक केलेले हे कृत्य असून यासाठी त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. 

देशात अशा घटना वारंवार होता काम नये, या घटनांवर अंकुश लागायला हवे, महिलांचे जीवन सुरक्षित झाले पाहिजे. यासाठी कायद्यांमध्ये बदल करून अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्येक्त केले. त्यासोबतच हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात जावा. 

सोबतच सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध विधीतज्ञ् उज्वल निकम यांनी पीडीतेची बाजू न्यायालयात मांडून पीडितेला न्याय द्यावा असेही त्यांनी निवेदनातून सांगितले. 

यावेळी माधुरी बोंडे, नीता बोढे, गीता पोपडे, विद्या बुरान, तेजस्विनी पावडे, माया राजूरकर, विभा आगलावे,आरती डुकरे, लीना राजूरकर याची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.